ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिरोंचा मेटॅडोअर संघटनेचा अध्यक्ष पदी मल्लेश बट्टी, सचिव पदी अविनाश बोलगावर यांची निवड

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र मेटॅडोअर बालक-मालक संघटना शाखा सिरोंचा विभागाची सभा दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, चंद्रपूर येथे सभा घेण्यात आली या बैठकीला मेटॅडोअर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीला सिरोंचा भागातील चालणारे सर्व मेटॅडोअर चालक-मालक प्रमुख्याने उपस्थित होते.

सर्वप्रथम राजेंद्र खांडेकर यांनी मेटॅडोअर संघटना व कार्यकारीणी कशासाठी याबद्दल उपस्थित मेर्टडोअर चालकास समजावून सांगीतले, संघटनेच्या माध्यमातून आपल्या मागण्या शासनदरबारी मांडता येतो व मागण्याची पूर्तता करता येते. संघटनेची ताकद ही आपली शक्ती आहेत असे मनोगत आपल्या भाषणात मांडले. त्यानंतर सर्व उपस्थित मेटॅडोअर चालकांच्या सहमतीने सिरोंचा मेटॅडोअर विभागाची कार्यकारीणी नेमण्यात आली.

यामध्ये अध्यक्षपदी मल्लेश लस्मय्या ब‌ट्टी, सचिवपदी अविनाश राजुया बोलगावार उपाध्यक्षपदी मलप्पा नानप्पा पडाला, सहसचिवपदी नागेश दुर्गय्या अल्लुरी तर कोषाध्यक्षपदी श्रीनिवास समय्या कोल्लुरी, संघटकपदी श्रीनिवास सत्यनारायण येतम, प्रसिध्दी प्रमुखपदी मल्लव्या किष्टय्या बुर्ती तर कार्यकारीणी सदस्य पदी श्रीनिवास बसावा, मलय्या पोचम इंदारपु, राजु पोचम इंदारपु यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयात स्वागत करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये