ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय स्वस्त धान्य दुकानाविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष करणार आंदोलन

गोरजा येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा मनमानी कारभार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती तालुक्यातील गोरजा या गावातील शासकीय स्वस्त धान्य दुकान चालक मंगेश घोरुडे यांच्या विरोधात कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्षा तर्फे तहसीलदार मार्फत अन्न पुरवठा मंत्री मंत्रालय मुंबई यांना निवेदन देण्यात आले. मंगेश घोरुडे हे रेशनकार्ड धारकांना दरमहा वितरणासाठी येणारे धान्य संपूर्ण रेशनकार्ड धारकांना न देता त्यांचे धान्य खुल्या बाजारात विकत आहे. याच प्रकारे रेशन दुकानातील धान्य काही महिण्यापुर्वी खुल्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांना दुकान चालक मंगेश घोरुडे यांना गावाकऱ्यांनी पकडून दिले होते. यावर तक्रार होऊन सुद्धा त्याचेवर कुठलीही करवाई झाली नाही.

             या प्रकरणात त्याने आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही तुम्हास जिथे माझे विरोधात तक्रार करायची आहे तिथे करा अशी गावाकऱ्यांना तसेच रेशन ग्राहकांना धमकावतो. त्याच प्रमाण राशन दुकान वेळी – अवेळी उघडतात असुन ग्राहकांना शिवीगाळ, अपशब्दात बोलतो. जे बी पी एल धारक आहे त्यांना धान्य मिळत नसुन ग्राहकांना नाहक त्रास सहन करवा लागत आहे.

राशन दुकानदाराची चौकशी करून त्याचे लायसन्स रद्द करावे अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे तीव्र जनआंदोलन करण्यार येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे.

        हे निवेदन विभागीय आयुक्त नागपूर, पोलीस महानिरीक्षक नागपूर, जिल्हा अधिकारी चंद्रपूर, जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी वरोरा, पोलीस उपविभागीय अधिकारी वरोरा यांना देण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये