ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या कृषी पंप विज जोडणीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

आ. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत होणार महत्त्वपूर्ण बैठक

चांदा ब्लास्ट

तातडीच्या उपाययोजना करण्याचा निर्धार

चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज जोडणीसंबंधी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन त्वरित उपाययोजना करून तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांनी ओलितासाठी कृषी पंपाच्या विज जोडणीसाठी अर्ज आणि डिमांड रितसर भरली असूनही विज वितरण कंपनीच्या उदासीन धोरणामुळे अनेक अर्ज प्रलंबित आहेत. विज अधिनियम २००३ मधील कलम ४३ (१) नुसार अर्ज केल्यावर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत विज पुरवठा करणे अनिवार्य आहे. तसेच, वेळेत विज पुरवठा न केल्यास कलम ४३ (३) नुसार प्रतिदिवस रु. १,०००/- इतका दंड लागू होतो. विज वितरण कंपनीने सदर अधिनियमाचे पालन न केल्यामुळे, विज अधिनियम २००३ चे कलम १२८ (१), (४) नुसार कंपनीची उच्चस्तरीय चौकशी करून कलम १२८ (६), (ख) नुसार परवाना रद्द करण्याची तरतूद आहे.

शासनाकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून “मागेल त्याला कृषीपंप जोडणी” या धोरणाचा अवलंब करण्यास पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे, कृषी पंप विज जोडणीसाठी अर्ज केलेले अथवा डिमांड भरलेले शेतकरी जे अद्याप विज मिळण्यापासून वंचित आहेत, त्यांनी तत्काळ कागदपत्रांसह माझ्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

या प्रलंबित प्रकरणांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, चंद्रपूर येथे विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे.सर्व शेतकरी बांधवानी सर्व कागद पत्रासह उपस्थित राहावे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये