नित्यानंद लघु व्यवसाय चे उद्घाटन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अक्षय तृतीया च्या शुभ मुहूर्तावर नित्यानंद गोपालन केंद्रा तर्फे गोउत्पाद विक्री दिवस आणि लघु व्यवसाय उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 6वाजता आरती, होम हवन ,गोमाता स्नान व पूजन आणि सायंकाळी 4वाजता नित्यानंद लघु उद्योग उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून लाभलेल्या सौ स्मिताताई अनिल चिताडे मॅडम, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका (महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर) डॉ. किसनरावजी भोयर (होमिओपॅथिक तज्ञ)श्री निलेश ताजने श्री धनंजय छाजेड, श्री स्वप्निल छाजेड,श्री उद्धव पुरी श्री पुरुषोत्तम मत्ते श्री हिम्मतराव , सौ कुंतन चौव्हान मॅडम(योगा टीचर), श्री प्रशांत गोखरे ,सौ किशोरी ताई गोखरे श्री अशोक ढवस श्री विठ्ठल गोरे श्री सचिन नीले , श्री नितीन उरकुडे ,श्री मनोज भोजेकर ,श्री महादेव हेपट, श्री सुधीर भाऊ कोटावर ,श्री सुरेश मत्ते, आणि गडचांदूर परिसरातील २००ते 3००प्रतिष्ठित मान्यवर महिला पुरुष बालगोपाल आणि आश्रमातील सेवेकरी उपस्थित होते आश्रमाचे अध्यक्ष श्री शंकरराव देवाळकर यांनी आश्रमाच्या आणि गोपालन सेवा आणि नित्यानंद लघु उद्योगातून गरजूंना रोजगार आणि गोमाता सेवा आणखी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आणि प्रसार करण्यासाठी सविस्तर माहिती दिली.
नित्यानंद लघु उद्योगामध्ये अगरबत्ती मशीन,दाल मिल फ्लोअर मशीन, मसाले मिक्सर मशीन आणि ऑइल मशीन, या सर्व मशिनरींचे उद्घाटन करण्यात आले तसेच धूप अगरबत्ती मच्छर अगरबत्ती शेना पासून बनवलेल्या मूर्ती , दंत मंजन ,गोमूत्र अर्क शेना पासून बनवलेले साबन आणि गो संधान केंद्र देवलापर (नागपुर) या संस्थे मधून गो उत्पाद औषधी वस्तूचे स्टॉल लावण्यात आले, तसेच आश्रम कमिटी तर्फे महिला सेवेकरांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि आरती करून सर्वांना अल्पोहार वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.