जिल्हा क्रीडा संवाद कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट
क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य तथा क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या निर्देशानुसार, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावीने क्रीडा संवाद कार्यक्रम बँडमिंटन हॉल, जिल्हा क्रीडा संकूल येथे घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, शिवछत्रपती पुरस्कारार्थी कुंदन नायडू, बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव डॉ. राकेश तिवारी, ॲथलेटिक्स राज्य संघटनेचे सहसचिव सुरेश अडपेवार, प्रकाश देवतळे, नेटबॉल संघटनेच्या सचिव जयस्वाल मॅडम, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील क्रीडा विषयक योगदान, यासाठी आर्थिक स्त्रोत, संवादातून विकास या सारख्या विषयांवर आमदार किशोर जोरगेवार यांनी क्रीडा संवाद कार्यक्रमाला संबोधित केले. क्रीडा संवाद कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडाविषयक विविध प्रश्नांवर चर्चा, गटचर्चा, क्रीडा तज्ञांचे मार्गदर्शन, क्रीडा प्रकारासंबंधीत अडीअडचणी, क्रीडा सुविधा व शासनाकडून अपेक्षा या विषयांवर बहुसंख्येने क्रीडा प्रेमिंनी सहभाग घेतला व चर्चा झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश पूंड यांनी, संचालन क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाले यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना, पालक, क्रीडा पत्रकार, क्रीडा प्रेमी, क्रीडा शिक्षक, खेळाडू, विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठीकरे, जयश्री देवकर, संदिप उईके, क्रीडा अधिकारी नंदू अवारे, मोरेश्वर गायकवाड सर्व क्रीडा मार्गदर्शक आदींनी सहकार्य केले.