सेवा पंधरवडानिमित्त्त 1 लक्ष 12 हजार रोपांची लागवड

चांदा ब्लास्ट
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असून या उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर वनवृत्तअंतर्गत व्यापक वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत चंद्रपूर वनवृत्तातील तीन वनविभागांमधील 19 परिक्षेत्रात एकूण 1 लक्ष 12 हजार 548 रोपांची लागवड करण्यात आली.
यात चंद्रपूर वन विभागात 37 हजार 999 रोपे, ब्रह्मपुरी वन विभागात 30 हजार रोपे, तर सेंट्रल चांदा वन विभागात सर्वाधिक 44 हजार 549 रोपे लावण्यात आली. या उपक्रमात स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समित्या, स्थानिक वन कर्मचारी, शाळा, महाविद्यालये तसेच विविध औद्योगिक कंपन्यांचा सक्रिय सहभाग राहिला. वनविभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या वृक्षलागवडीमुळे जैवविविधतेचे संवर्धन, पर्यावरण संतुलन तसेच हरित चंद्रपूर निर्मितीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले गेले आहे.