शुभांगी ढवळे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारने सन्मानित
ग्रामीण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य ; कोरपना तालुक्यातून महेश एस मरापे व पवन ए कातकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ग्रामविकास अधिकारी यांनाही केले सन्मानीत
कोरपना पंचायत समितीच्या ग्रामविकास अधिकारी शुभांगी ढवळे यांनी ग्रामपंचायत निमणी येथे मागील ३ वर्षाच्या कालावधीत ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्याचे काम केल्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जिल्हा परिषद चंद्रपूर कडून नुकताच आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांच्या हस्ते शुभांगी ढवळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी आमदार सुधाकर अडबाले किशोर जोरगेवार देवराव भोंगळे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे मीना साळुंखे नूतन सावंत शिक्षणाधिकारी राजेश पाताळे अश्विनी केळकर आदी उपस्थित होते.
आदर्श पुरस्कार स्विकारताना त्यांच्यासोबत त्यांचे वडील दिलीप ढवळे पती अविनाश गाडगे मुलगी निधी गाडगे मुलगा आयुष गाडगे उपस्थित होते.ग्रामविकास क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची आणि योगदानाची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन वर्षाव होत आहे.