ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासातील त्याग,शौर्य व पराक्रमाचे स्मरण करून देणारा दिवस आहे.हैद्राबाद संस्थानाला निजामशाही च्या तावडीतून सोडविण्यासाठी अनेक शुरविरांनी प्राणाची आहुती दिली.आणी निजामाच्या ताब्यातुन मुक्त होऊन संस्थान भारतीय संघराज्यात समायोजीत झाला.दरवर्षी कोरपणा येथे हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून हुतात्मा झालेल्या शुरविरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

उद्योग क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केल्याबद्दल लंडन येथे झालेल्या ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन मध्ये युवा उद्योजक निलेश ताजणे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कारांनी सन्मानित केल्याबद्दल माजी गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

भाजप कोरपना तालुक्याच्या वतिने मराठा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण तथा भारताचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने ग्रामीण रुग्णालय,कोरपणा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर,अरूण मस्की भाजपा नेते, अनिल फुलझेले,नारायण हिवरकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष,संजय मुसळे तालुका अध्यक्ष कोरपना,निलेश ताजणे युवा नेते,राजु घरोटे,आबिद अली राष्ट्रवादी नेते, सतिश उपलेंचिवार,रामभाऊ मोरे नगरसेवक,किशोर बावणे,सुरेश केंद्रे,शिवाजीराव शेलोकर,महादेव एकरे,महादेव जयस्वाल,महादेव तपासे,जनार्धन निकोडे, केशवराव ठाकरे,राहुल सुर्यवंशी,अरूण डोहे,प्रशांत घरोटे,विशाल गज्जलवार,रमेश मालेकर,कवडु जरिले,अमोल आसेकर, सतिश बेतावार,जयाताई धारणकर,अल्काताई रणदिवे,इंदिरा कोल्हे,गिराताई डोहे,वर्षांताई लांडगे यांचेसह भागातील गणमान्य नागरीक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये