Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

कोलांडी येथील नित्यानंद आश्रमात व्यापारी चे पारिवारिक स्नेहमिलन साजरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 ज्ञानगंगा नित्यानंद आश्रम सेवा संस्था कोलांडी येथे गडचांदूर येथील प्रतिष्ठित व्यापारी मित्र परिवार व सद्गुरू नित्यानंद सेवा समिती कडून पारिवारिक सस्नेह मिलन सोहळा 19 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गडचांदूर व्यापारी वर्गातील दोनशे ते तीनशे भक्तगणाने संस्थेच्या निसर्ग रम्य परिसरातील आश्रमात नृत्य,गायन स्पर्धा ,लकी ड्रा,हौसी स्पर्धा तसेच इतर रंगारंग कार्यक्रम घेण्यात आले तसेच विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले भाविक आनंदाने द्विगुणित झाले ,या कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन महाआरती करून करण्यात आली या कार्यक्रमाला श्री हंसराज भैया चौधरी ,श्री संजू भाऊ मेंढी,श्री सतीश भाऊ उंपलंचवार,श्री धनंजय भाऊ छाजेड , संजय कोंडबत्तुलवार, श्री प्रशांत भाऊ पोतनूरवार ,श्री पानघाटे ,श्री पराग गोरशिट्टीवार , श्री सतीश भाऊ भोयर ,श्री सतीश भाऊ बेतावार ,श्री व्यंकटेश अण्णा, श्री हरिभाऊ घोरे,श्री अजय भाऊ लांजेवार, श्री राकेश भाऊ शेंद्रे ,श्री संजय भाऊ रणदिवे, श्री अरविंद भाऊ डोहे ,श्री संतोष भाऊ छाजेड ,श्री विजय भाऊ ठाकूरवार ,श्री मुकेश शिरू ,श्री प्रशांत भाऊ दरेकर,श्री निखिल भाऊ वैद्य ,श्री विलास भाऊ पांडे ,श्री संतोष भाऊ चोपणे ,संतोष भाऊ ठाकूर , श्री निलेश भाऊ भगत ,श्री तुळशीराम भाऊ पानघाटे ,श्री संजयभाऊ गोखरे, श्री विठ्ठल भाऊ वैद्य ,श्री निलेश ताजणे ,श्री हिरामण मडावी श्री सतीश आत्राम श्री रितू खुराना,श्री विठ्ठल पाचभाई श्री कृष्णा वायकर श्री प्रकाश भाऊ निमजे श्री विठ्ठल भाऊ डाखरे श्री किशोर भाऊ बोबडे परिवारांची उपस्थिती होती तसेच आश्रमातील अध्यात्मिक सेवेबद्दल आणि सामाजिक सेवेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आणि भविष्यात या स्थानावर ज्या आध्यात्मिक आणि सामाजिक सेवा करायच्या आहे त्यासाठी त्यांनी मार्गदर्शन आणि सहकार्याची भावना प्रगट केली संस्थेचे अध्यक्ष श्री शंकर देवाळकर यांनी आश्रमात आणि गोपालन सेवा झालेल्या कार्याची माहिती दिली आणि भविष्यात जे कार्य करायचे आहे.

त्याबद्दल सविस्तर माहिती देऊन त्याबद्दल सहकार्याची अपेक्षा दर्शवली त्यासोबतच गडचांदुर व्यापारी विभागाकडून संस्थेच्या कमिटीचा सत्कार करण्यात आला तसेच भाविकांना नाष्टा, भोजन तसेच मलाई दूध वितरण करण्यात आले तसेच ज्ञानगंगा नित्यानंद आश्रमाचा भविष्यकालीन साहार्थ कार्यासाठी व्यापारी मित्र परिवाराकडून व त्यांच्या अनुषंगातून व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री हंसराज भैय्या चौधरी आणि व्यापारी श्री धनंजय भाऊ छाजेड श्री संजय भाऊ मेंढी यांनी या कार्यक्रमाची संकल्पना करून या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले आणि सर्व व्यापारी वर्गाने या सेवेला उत्तम प्रतिसाद देत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये