प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने लाडू वितरण

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : भारताचे यशस्वी प्रधानमंत्री, देशगौरव माननिय नरेद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिवस भारतीय जनता पार्टी, भाजयुमो व पक्षाच्या विविध आघाड्यांच्या वतीने साजरा करण्यात आला. दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी, स्थानिक गिरनार चैकातील मा. हंसराजजी अहीर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात मा. मोदीजी यांच्या दिर्घायुष्य व निरामय स्वास्थ्याकरिता प्रार्थना करण्यात आली. यावेळी नागरिकांना लाडूचे वाटप करण्यात आले.
भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांच्या नेतृत्वात आयोजित जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळाप्रसंगी भाजपा चंद्रपूर ग्रामिण तालुकाध्यक्ष विनोद खेवले, ओबीसी मोर्चा महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, भाजपा घुग्घूस शहराध्यक्ष संजय तिवारी, भाजपा चंद्रपूर महानगरचे महामंत्री शाम कनकम, पुनम तिवारी, राम हरणे, अॅड. प्रशांत घरोटे, ललीत गुलानी, नकुल आचार्य, कमल कजलीवाले, राहुल सुर्यवंशी, शैलेश दिंडेवार, सुबोध चिकटे यांचेसह भाजपा, भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.