ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रहमत नगर येथे सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटमधून क्लोरीन गॅस लिकेज _ आ. जोरगेवार घटनास्थळी

परिस्थिती नियंत्रणात, घाबरण्याची गरज नाही - आ. किशोर जोरगेवार

चांदा ब्लास्ट

रहमत नगर येथील सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट मधून क्लोरीन गॅस लिकेज झाल्याने नागरिकांना उलटीचा आणि श्वसनाचा त्रास झाला होता. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह प्लांटची पाहणी केली. आमदार जोरगेवार यांच्या सूचनेनंतर सदर लिकेज बंद करण्यात आले असून सावधगिरी म्हणून येथील नागरिकांना इतरत्र हलविण्यात आले आहे. स्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, मनपाच्या प्रभारी आयुक्त आयुक्त वर्षा गायकवाड, शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार रामटेके उपस्थित होते.

           रहमत नगर येथे चंद्रपूर महानगरपालिकेचा सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट आहे. सदर प्लांटमधून क्लोरीन गॅस लिकेज झाल्याची घटना आज (बुधवार) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. गॅस गळतीमुळे परिसरातील अनेक नागरिकांना उलटी व श्वसनाचा त्रास सुरू झाला. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांसह घटनास्थळी भेट दिली. यावेळी तातडीने गळती बंद करण्यात आली असून जवळपासच्या नागरिकांना किदवई हायस्कूल येथे हलविण्यात आले आहे.सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये