ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुक्तिसंग्राम दिन भावी पिढ्यांसाठी दिशादर्शक – हंसराज अहीर

हंसराज अहीर यांचे शुभहस्ते कोरपना व जिवती येथे ध्वजारोहण ; सेवा पंधरवाडानिमित्त विद्यार्थ्यांना नोटबुक्स व रूग्णांना फळ वितरण

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : निजामांच्या जुलमी सत्तेतून मुक्ती मिळालेला आजचा हा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन असून, आम्हा सर्वांसाठी हा दिवस एक मोठा महोत्सव आहे. भारताचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांचा जन्मदिवसही आज आहे. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल व नरेंद्र मोदी जी यांचे राष्ट्रोध्दारात मोठे योगदान असून त्यांचे देशसेवेचे हे कार्य समस्त देशवासियांकरिता सदैव प्रेरणा देत राहील. मुक्तिसंग्राम दिनाचा हा सोहळा वर्तमान व भावी पिढ्यांसाठी निरंतर दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ध्वजारोहण प्रसंगी केले.

      राजुरा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी, जिवती व कोरपना येथे अहीर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास सर्वश्री राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर, चंद्रपूरचे माजी उपमहापौर अनिल फुलझेले, अरूण मस्की, शिवाजी सेलोकर, महादेव जयस्वाल, महादेव एकरे, राजु घरोटे, अमोल आसेकर, किशोर बावणे, सुरेश केंद्रे, केशव गिरमाजी, गोविंद टोकरे, राजेश राठोड, गोपीनाथ चव्हाण, माधव कुळसंगे, सौ. अर्चना भोंगळे, दत्ता राठोड, संजय मुसळे, नारायण हिवरकर, सतिश उपलेंचवार,कवडू जरीले, वसंत बहीरे, शशीकांत आडकीने, प्रमोद कोडापे, सतिश बेतावार, राहुल सुर्यवंशी यांचेसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते.

            आपल्या भाषणात हंसराज अहीर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षांच्या कारकीर्दीत देशाचा सर्वच क्षेत्रात अभुतपूर्व विकास झाला आहे. त्यांच्या राष्ट्रौध्दारक कार्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करीत, अहीर यांनी प्रधानमंत्र्यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपाच्या वतीने आयोजित सेवा पंधरवाडा विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांना आवाहन केले.

             मागील अनेक वर्षांपासून जिवती तालुक्यातील शेतजमिनी, वसाहती वनक्षेत्राच्या कचाट्यात सापडल्या होत्या, परिणामी या तालुक्यातील विकास कार्य खुंटल्या गेले. नागरिक, शेतकरी विकासाच्या सोयीसुविधांपासून दूरावला गेला होता. राज्य सरकारने हा अन्याय दूर करीत हजारो हेक्टर जमिनी वनक्षेत्रातून वगळण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतल्याने याकरिता केलेल्या प्रयत्नांना यश लाभले ही बाब अतिव समाधान देणारी आहे. अजूनही अनेक समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी आपण कसोशिने प्रयत्न करणार आहे असेही अहीर यांनी यावेळी सांगितले.

           पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या देशातील लोकांना संविधानिक तत्वांचा अवलंब करीत न्याय दिला आहे. शिक्षण असो की आरोग्य, शेती असो की उद्योग, देशांतर्गत सुरक्षा असो की राष्ट्राची सुरक्षा अशा प्रत्येक बाबतीत त्यांनी देश वासियांचा स्वाभिमान जागवला आहे. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आहे. एवढे महान नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपणास लाभले हे या देशाचे अहोभाग्यच आहे.

                मोदीजींनी शेकडो योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविला. महत्वकांक्षी आयुष्यमान भारत योजना, हर घर जल योजना, आवास योजनांनी देश घडविला आहे. दुर्धर आजाराच्या औषधांचे मुल्य कमी करून, करोडो लोकांना न्याय दिला, जीएसटी कपात करून सर्व घटकांना दिलासा दिला ही प्रधानमंत्र्यांची महानता आहे असेही ते म्हणाले.

                यावेळी नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांच्या दिर्घायुरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सेवा पंधरवाडाचे औचित साधून कोरपना व गडचांदूर येथील ग्रामिण रूग्णालयातील रूग्णांना फळ वितरीत करण्यात आले. जिवतीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक्सचे वितरण करण्यात आले. कोरपना येथील ज्येष्ठ नागरिक, आदर्श शिक्षक तसेच नव उद्योजक दिलीप ताजने यांचाही सन्मान करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये