ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जय हिंद चौक, बाबूपेठ येथे १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर डीपी आणि एलटी लाईनचे भूमिपूजन समारंभ संपन्न

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांनी 100 KV Transformer DP & LT Line ची मागणी केली होती. वारंवार वोल्टेज कमी असल्यामुळे घरगुती लाईन वारंवार जात असते, अशी तक्रार भाजपचे कार्यकर्ते विनोद पेन्लीवार, मंगेश पंचलवार, रवि नंदूरकर, सौ वर्षा मांढरे व वार्डातील नागरिकांकडून प्राप्त झाली. ही मागणी माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांच्या पाठपूराव्याने पूर्ण झाली असून 14 लाख 7 हजार 844 रू मंजूर झाले व त्याचे आज भूमिपूजन जय हिंद चौक बाबूपेठ येथे भाजपा चंद्रपूर महानगर जिल्हाचे अध्यक्ष श्री मंगेश गूलवाडे यांच्याहस्ते करण्यात आले.
या शुभप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा चंद्रपूर महानगर जिल्हाचे अध्यक्ष श्री मंगेश गूलवाडे, माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर, माजी नगरसेवक श्याम कनकम, माजी नगरसेविका ज्योती गेडाम उपस्थित होते. यावेळी वार्डातील भाजपा शक्तीकेंद्र सोशल मीडिया प्रमुख विनोद पेन्लीवार, मंगेश पंचलवार, अनंता मल्लेलवार, बाबुराव झुरमुरे, सौ वर्षा मांढरे, प्रशांत रोहनकर, भारत मडावी, कैलास नंदनवनार, किशोर ठाकरे, रितिक भीमारे, सौ पुष्पा मांढरे, शोभा राजूरकर, सूरेखा मांढरे, संध्या मांढरे,अनिता मांढरे, कल्पाना मांढरे, ज्योत्सना पचारे, निता कामटकर, सौ सपना आकुलवार, सौ बेबीताई श्रीकोंडावार, श्री सुनील पुनकटवार, गंगाधर देशट्टीवार, नागेश भिमारे, किसन आकुलवार, सागर जाजूलवार, अतुल यमनूरवार, अशोक श्रीकोंडावार, प्रकाश पडाल, दिनेश मांढरे, राकेश पचारे, विजय कमळापूरवार, बंडू बल्लावार, खुशाल मत्ते, रवींद्र मांढरे, संतोष मांढरे,   चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये