तहसील कार्यालयात लोक अदालतीचे आयोजनच नाही
तालुक्यातून आलेल्या शंभराचे वर शेतकऱ्यांनी केला निषेध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
राज्य शासनाच्या महसूल विभागातर्फे राज्यभरातील महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्याकरिता तहसील कार्यालयस्तरावर लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१७ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या लोक अदालतीमध्ये आपल्या शेतीसंबंधी समस्या मांडण्याकरीता शंभराच्या वर महिला व पुरुष शेतकरी तालुक्यामधून आले होते.
लोक अदालतीच्या कार्यक्रमाची तयारीच नसल्याने ते सर्वजण निषेध नोंदवून परत गेले.
राज्य शासनाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा काळ महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार शेती संदर्भात असलेल्या समस्येबाबत लोक अदालतीचे माध्यमातून समस्यांचे निवारण करण्यात येणार आहे.कलम १५५ नुसार संगणीकृत सातबारा दुरुस्ती,पांधन रस्ते, प्रलंबित जुन्या प्रकरणांचा निपटारा यासह इतर महसूल विभागाची संबंधित कामांचा समावेश आहे.
याकरीता तहसील कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या यानुसार आपल्या शेतीसंबंधी समस्याचे निवारण करण्याकरीता तालुक्यातून शंभराचे वर महिला व पुरुष शेतकरी आले. लोक अदालत सकाळी १० वाजता सुरू होणार होती परंतु दुपारी १ वाजेपर्यंत लोक अदालत घेण्याची तयारी करण्यात आली नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बहिष्कार टाकून निषेध नोंदवून ते निघून गेले. यासंदर्भात तहसीलदार राजेश भांडारकर यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांनी आपला भ्रमणध्वनी संच आपले सहकारी यांचे कडे देऊन बोलण्याचे टाळले.
सकाळी १० वाजता सुरू होणारी लोक अदालत दुपारी १ वाजेपर्यंत सुरू न झाल्याने याबाबत उपस्थित महसूल अधिकारी यांना विचारणा केली असता या संदर्भात आम्हाला तहसीलदारांनी सूचना न दिल्याने ही लोक अदालत आम्ही घेऊ शकत नसल्याचे सांगितले. तहसीलदार सायं. ४ वाजता आल्यानंतर त्यांच्याशी बोलणे झाले.असता मला या संदर्भात चंद्रपूरला बोलावले असल्याने मी तिथे होतो असे त्यांनी म्हटले.
विजय वानखेडे, अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना भद्रावती