कुंभेझरी येथे अंगणवाडी केंद्र भाड्याच्या खोलीत…
इमारत तात्काळ मंजूर करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायत कुंभेझरी अंतर्गत येत असलेल्या मराठगुडा येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक ४ येथे अंगणवाडी इमारत उपलब्ध नसल्याने येथील अंगणवाडी सेविका यांनी भाड्याची खोली तिथे मुलांना शिक्षणाचे धडे, व शैक्षणिक उपक्रम राबवून,खिचडी व इतर पोषण आहार देतात.ग्राम पंचायत स्तरावरून अनेकदा बालविकास प्रकल्प कार्यालय, तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना पत्र व्यवहार केले व मागणीचे प्रस्ताव सुद्धा पाठवले.
परंतु प्रशासनाकडून कसलीच कारवाई झालेली नसल्याचे ग्राम पंचायत चे उपसरपंच लहु गोतावळे यांनी सांगितले. प्रशासकीय काळात अधिकारी हे त्यांचे हितचिंतक व जवळील नेत्यांच्या गावातील कामांना प्रथम प्राधान्य दिल्या गेले असे ठळक आरोप त्यांनी केले आहेत. त्यामुळे आजपर्यंत अनेकदा निवेदने व प्रस्ताव देऊन संबंधित विभाग प्रमुखांकडून कुठलेही कारवाई केली नसल्याने सदर अंगणवाडी मंजूर केव्हा होईल? व ही मुले आपल्या हक्काच्या अंगणवाडी इमारतीत शिक्षणाचे धडे गिरवतील का?याकडे आता गावातील सर्व मुलांच्या पालकांचे लक्ष लागले आहे.
यावर संबंधित अधिकारी प्रशासन काय भूमिका घेतील, व तात्काळ अंगणवाडी इमारत मंजूर करून मुलांना या पडक्या भाड्याच्या बंद खोलीतून प्रशस्त इमारतीत मोकळा श्वास घेतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.