नगरपरिषद देऊळगावराजा हद्दीतील शासकीय जागेवर पंतप्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत येथील शहरी गृहनिर्माण योजनांमध्ये नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा
जय शिवसंग्राम संघटनाची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरातील नगरपरिषद हद्दीतील संजय नगर व छोटा फुकटपूरा( गरीब नवाज नगर व महाराणा प्रताप नगर ) या दोन वस्ती शासकीय जागेवर अंदाजे 40 ते 50 वर्षापासून असून येथे गोरगरीब नागरिक राहत आहे. या भागामध्ये दुर्बल घटकाचे नागरिक या वस्तीमध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी रोज कमावणे रोज खाणे हे यांचे जीवन आहे. या गोरगरीब नागरिकांना आशा आहे की पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 रोजी स्वप्न पाहिले होते की दुर्बळ घटकांतील गोरगरीब नागरिकांना घर बांधून देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकाराने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत गोरगरीब लोकांना घरकुल देण्यासाठी योजना चालू केली.
या योजने मार्फत लाखो लोकांना लाभ झालेला आहे. शासकीय जागेत वास्तव्य असलेले नागरिकांचे स्वप्न आहे की ज्या पद्धतीने रमाबाई आवास योजना शासकीय जागेत देण्यात येते तसेच दुर्बळ घटकातील व उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांनाही प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी जय शिवसंग्राम संघटना देऊळगाव राजा यांच्या वतीने मा. ना. श्री देवेंद्रजी फडणवीस ,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मा. ना. श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.
निवेदनावर तालुकाध्यक्ष जहीर खान, तालुका उपाध्यक्ष मुबारक चाऊस, शहराध्यक्ष अजमत खान, युवक शहराध्यक्ष शंकर वाघमारे, अनिस शहा, शेख इमरान, राजेश भाग्यवंत, राजू गव्हाणे, शेख अहमद, असलम खान, साजिद खान, किशोर वाघ,संतोष हिवाळे, आदीच्या स्वाक्षरी आहे.