ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोजगार मेळाव्यात१३२ बेरोजगारांना मिळाला रोजगार 

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे रोजगार मेळावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर येथे दिनांक १६ सप्टेंबर रोजी भव्य रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्याचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर आणि महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

        या मेळाव्यात एकूण ४१६ युवक-युवतींनी सहभाग नोंदवला होता तर १३२ उमेदवारांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली. परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी एकूण नऊ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता.

ओमेंट वेस्ट प्रा. लि. चंद्रपूर ५७ पदे, साई वर्धा पॉवर लि. वरोरा १५ पदे, जेपी असोसिएट्स अँड लॅबोरेटरीज चंद्रपूर २० पदे, गोपनी अँड आयर्न पॉवर लि. १० पदे, विदर्भ क्लीक १ सोल्युशन चंद्रपूर २०० पदे, वैभव इंटरप्रिन्सेस नागपूर ६७० पदे, डिक्सन इंजिनिअरिंग प्रा. लि. नागपूर २० पदे, एसबीआय लाईफ इन्शुरन्स चंद्रपूर १०० पदे आणि संसार सृष्टी इंडिया प्रा. लि. चंद्रपूर ५० पदे अशा विविध कंपन्यांनी भरती प्रक्रियेत भाग घेतला. या कार्यक्रमाचे उद्घाटन गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय गोरे यांच्या हस्ते पार पडले.

प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष विकास भोजेकर, संचालक रामचंद्र सोनपितरे, संचालक राहुल बोढे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक राधिका गायकवाड, सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांनी प्रास्ताविक करून महाविद्यालयाच्या रोजगाराभिमुख उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ. मनोहर बांद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पवन चटारे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. रामकृष्ण पटले, प्रा. चेतन वानखेडे, डॉ. अनिस खान, डॉ. शर्मा, डॉ. घोडिले, डॉ. मुन, प्रा. वैद्य तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये