पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षलागवड कार्यक्रम संपन्न
सेवा पंधरवाडा अभियान २०२५ तसेच हरीत महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नविन व समृध्द भारताचे शिल्पकार, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अभियान २०२५ तसेच हरीत महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र मोहीम अंतर्गत वनपरीक्षेत्र अधिकारी भद्रावती (प्रादे.) चंद्रपूर वनविभाग व्दारा आज (दि.१७) ला वृक्षलागवड मोहीम २०२५ सोहळा आयोजन करण्यात आले.
या वृक्षलागवड सोहळयास प्रमुख उपस्थिती चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर अध्यक्ष रविंद्र शिंदे, भद्रावती वनरीक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू डोंगे, नगर परीषदचे माजी उपाध्यक्ष संतोष आमणे, स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, भाजपा पदाधिकारी अमित गुंडावार, ईम्रान खान, अशोक निखाडे तथा भद्रावती वनविभाग क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, क्षेत्र सहाय्यक अरविंद शेळकी, व्ही आर ठाकरे, वनरक्षक ज्योत्सना माऊलीकर, संजय पेंदोर, एस. एस. मेश्राम, ए. बी. रोहीले, एम. आर. देठे, एच. एस. भवरे, एन.व्ही. निरांजणे, ए. एम. चाहांदे, एम. आर. चौधरी, एस. आर. कुळमेथे, ज्ञानेश्वर धंदरे वनअधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
वृक्षलागवड सोहळा कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक जे. ई. देवगडे यांनी केले.