ताज्या घडामोडी

स्थानिक गुन्हे शाखा वर्धा तर्फे पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) हद्दीतील कारवाईb

चोरीची रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक/मालक याच्या ताब्यातून एकूण 11 लाख 10 हजाराचा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       दिनांक 16/11/2024 रोजी स्था. गुन्हे शाखा वर्धा द्वारे पो. स्टे. सावंगी (मेघे) हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई ची मोहीम राबवित असताना गोपनीय माहितीच्या आधारे सदर ट्रॅक्टर चालक/मालक मंगेश नामदेवराव राऊत, वय 35 वर्ष, रा महाकाळ, हा त्याचे ताब्यातील एक जुना वापरता सिल्वर रंगाचा आईसर कंपनीचा ट्रॅक्टर क्र. MH 32 P 3369 चे लाल रंगाच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे 1 ब्रास काळी ओली रेती (100 फुट) भरून रेतीची वाहतूक करताना मिळून आला. ट्रॅक्टर चालक-मालक यास रेती कुठून आणली, याबाबत विचारणा केली असता त्याने आरोपी 2) मंगेश करलुके (पसार), 3) भरत भोंगाडे (पसार) सर्व रा. महाकाळ ता.जि. वर्धा यांनी मौजा महाकाळ शिवारातील धाम नदीचे पात्रात शिवर इलेक्ट्रिक मोटर पंप ची पाण्यावर तरंगनारी बोट तयार करून तीचे साह्याने धाम नदीचे पात्रातून काळी ओली रेती चे उत्खनन करून सदरची रेती ची चोरटी वाहतूक करण्याकरिता ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये भरून आणली आहे त्यावरून धाम नदीचे पात्राची पाहणी केली असता 02 इलेक्ट्रिक मोटर पंप बोटी रेती उपसा करतांना दिसुन आल्याने पंचासमक्ष 1)एक जुना वापरता सिल्वर रंगाचा आईसर कंपनीचा ट्रॅक्टर क्र. MH 32 P 3369 किंमत 6,00,000/- रू. 2)एक लाल रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली कि. 2,00,000/- रु 3)1 ब्रास (100 फुट) काळी ओली रेती कि. 5,000/-रु., 4)2 लुबी बी.एम. 619 कंपनीची 7.5 एचपी. पाण्यातील इलेक्ट्रिक मोटर पंप किं. 2,50,000/- रु., 5)2 पिवळ्या रंगाच्या चैनपुली किं. 30,000/- रु., 6)अंदाजे 100 फूट इलेक्ट्रिक केबल, 2 स्टार्टर, पाईप, प्लास्टिक ड्रम व इतर साहित्य किं. 25,000/- रु. असा एकुण जु. किं. 11,10,000/- रू. चा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला. ट्रॅक्टर चालक मालक व रेती उत्खनन करणारे आरोपीविरुध्द कलम 303(2), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

        सदर कारवाई मा. श्री अनुराग जैन साहेब, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस अमलदार गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भूषण नीघोट, रितेश शर्मा, मनीष कांबळे, अमोल नगराळे, गोपाल बावनकर, मंगेश आदे, दीपक साठे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये