ताज्या घडामोडी

श्री महर्षी विद्या मंदिर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट –

श्री महर्षी विद्या मंदिर , दाताला येथे ७५ वा गणराज्य दिन अतिशय उत्साहात साजरा केला गेला. विद्यार्थ्यांना आभासी पद्धतीचा अवलंब करून कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ऍडव्होकेट श्री. मुकुंद टंडन लाभलेले होते. गुरुकुल शिक्षा संस्थेचे अध्यक्ष श्री. गिरीश चांडक , उपाध्यक्ष श्रीमती. वसुधा कंचर्लावार, सचिव श्री . दत्तात्रय कंचर्लावार , सदस्य श्री. वीरेंद्र जैस्वाल उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. त्या नंतर अध्यक्षांच्या व मुख्य अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायिले गेले.
या प्रसंगी अध्यक्ष श्री. गिरीश चांडक सरांनी प्रेरणात्मक भाषण दिले . त्यांनी आपल्या भाषणात संविधानातील नियमांचे पालन करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री. मुकुंद टंडन यांनी आपल्या भाषणातून योग साधनेचे महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमात वर्ग ९ वि चा विद्यार्थी युगांत पेंदाम याने इंग्रजी भाषेतून भाषण दिले. वर्ग ७ वि ची कु. आर्य चिंचोलकर हिने मराठीतून भाषण दिले. तर वर्ग १० वि ची कु,. सृष्टी प्रतापवार हिने हिंदी भाषेतून भाषण दिले.
या प्रसंगी वर्ग ५ वि च्या विद्यार्थ्यांनी ‘आज तिरंगा लहराता है अपनी पुरी शान से ‘ हे देशभक्ती गीताचे सादरीकरण केले . तर वर्ग ७ वि व ८ व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले.
कार्यक्रमाच्या शेवटी कराटे स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त मुलांना मुख्य अतिथी व अध्यक्षांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन (तेजस उत्तरवार, देवांश कारपाका, अंशुमन दाभेरे ) यांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचा शेवट वर्ग ९ वि च्या विद्यार्थिनी कु. पल्लवी गड्डम हिने सांगता करीत आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन वर्ग ९ वि ची विद्यार्थिनी कु. भूमिका मित्तल व ८ वि ची विद्यार्थिनी कु. श्रीजा चौधरी हिने केले.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. श्रीलक्ष्मी मूर्ती व उपमुख्याध्यापिका श्रीमती. निशा मेहता यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शाळेतील शिक्षकवृंद तसेच क्रीडा शिक्षक, कला शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये