ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
हरित व समृध्द महाराष्ट्र अभियान अंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम
वनपरिक्षेत्र कार्यालय भद्रावतीच्या वतीने न्यु. पिपरबोडी येथे वृक्ष लागवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
आपल्या परिसरात पर्यावरण पूरक आणि हरित उपक्रमांना चालना देण्यासाठी “हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र” या अभियाना अंतर्गत सन २०२५ करिता १० कोटी वृक्ष लागवाड मोहीम महाराष्ट्र शासनाद्वारे राबवण्यात येत आहे.
या अभियाना अंतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालय भद्रावतीच्या वतीने बुधवार दि.१७ सप्टेंबर सकाळी ११ वाजता भद्रावती तालुक्यातील न्यु.पिपरबोडी, कक्ष क्र.२१८ येथे वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वृक्ष लागवड मोहिमेत मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन आव्हान वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) किरण धानकुटे यांनी केले आहे.