खरंय त्या राजकुमारने पृथ्वीतलावर असताना सर्वच नाती योग्यरित्या जोपासली
अनंतात विलीन होण्यापूर्वीही संकल्प पूर्ती करून नेत्रदाणा सारख्या महान दाणात लावला हातभार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
या पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक मनुष्य जीव हा जाण्यासाठीच आलेला असतो ज्याला जीवनाचा अर्थ समजला तो आपली ओळख कोणत्या ना कोणत्या रूपाने करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करतो असंच झालंय शहरात व पंचक्रोशीत अल्पावधीत प्रत्येकाच्या मनात घर करून गेलेले *राजकुमार उर्फ चिनू भाई* नावाच एक व्यक्तिमत्व अल्पशा आजाराने दिनांक 11 सप्टेंबर रोजी अंनतात विलीन झाले.
मात्र फार मोठी ओळख सर्वांसाठी सोडून गेले *खरय* त्या राजकुमार ने पृथ्वीतलावर असताना सर्वच नाती अगदी योग्यरित्या जोपासली ही व्यक्ती एक चांगला मुलगा होऊ शकला याचबरोबर एक भाऊ एक पती एक पिता एक मामा एक काका एक शलक याचबरोबर एक चांगला सासऱ्या सोबतच त्यांनी रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन फार मोठा मित्र मैत्रिणीचा परिवार जोडून ठेवला होता महाराष्ट्रातील अपवाद म्हणून असे एखाद शहर असेल की त्या ठिकाणी त्यांचें आपुलकीचे संबंध नव्हते त्यांनी जीवन जगताना सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न केला वयाच्या विसाव्या वर्षी वडिलांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर घरातील सर्व जबाबदारी यांच्यावर येऊन पडली त्यांनी आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व समस्यांचा सामना एकट्याने करण्याचा निर्णय घेतला एक लहान भाऊ एक लहान बहिण यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण करून भावाला एमएसईबी मध्ये नोकरी मिळून दिली तोच भाऊ *पवन कुमार* आज संभाजीनगर मध्ये वीज वितरण कंपनीमध्ये मुख्य अभियंताच्या पदावर केवळ या *अवलिया राजकुमार* मुळेच आहे हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. लहान बहिण *वर्षा* साठी योग्य स्थळ पाहून *विशालकुमार* सारखे जीवन साथी मिळऊन दिले.
स्वतःच्या 2 मुलींना उच्च शिक्षण देऊन मोठ्या मुलीचे *सेजल* चे डॉक्टर होण्याचे सप्न पूर्ण केले. या राजकुमारची अर्धांगिनी *शुक्ला* व संपूर्ण परिवार हा धार्मिक वृत्तीचा असल्याने भगवंताची सेवा करण्यामध्ये हा संपूर्ण परिवार नेहमीच अग्रेसर असायचा यासोबतच संपूर्ण परिवार जैन मुनी भक्त असल्याने त्यांच्या हातून अनेक महाराज व साध्वी यांची सेवा झालेली आहे. जैन समाजामध्ये ज्या कठीण तपस्या सांगितलेल्या आहेत त्या तपस्या राजकुमार च्या मदतीने *शुक्ला* ने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. रक्ताचे नाते जोपासत असताना त्यांनी अठरापगड जाती धर्मातील मित्रांना एकत्रित केले होते त्यांचा मित्रपरिवार फार मोठा होता त्यांनी पृथ्वीतलावर असताना *पत्रकारिता क्षेत्रात* *सामाजिक क्षेत्रात* भरीव योगदान दिले आहे राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या एनजीओ *जायंटस वेलफेअर फाउंडेशन* *भारतीय जैन संघटनासाठी* सुद्धा त्यांनी भरीव योगदान दिले आहे त्यांनी मृत्यूपूर्वी नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता तो संकल्प त्यांच्या परिवारातील सदस्यांनी पूर्ण करून आजही त्यांचे नेत्र जिवंत ठेवले आहे व या नेत्रदाना मुळे दोन अंध व्यक्तीं च्या जीवनात प्रकाश टाकण्याचे काम या महान परिवाराने केले असून त्या दोन अंध व्यक्तीना हे सुंदर जग पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे या राजकुमारच्या जाण्याने सर्व क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली.
आजही अनेकांच्या मुखी एकच शब्द आहे हे कसे शक्य आहे त्या माणसाने जीवन जगताना प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे पाळली आहार घेताना काळजी घेतली शरीराला योग्य वेळी योग्य प्राणायाम ,व्यायाम दिला तरीही त्या व्यक्तीसोबत असं घडलं हे शक्यच नाही अस सर्व समाज मन म्हणताना दिसत आहे.