ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिंपरी (देश) येथे अवैध रेती उपसा सुरूच

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          पिंपरी (देश) येथील वर्धा नदी घाटाचे लिलाव २०२५ मध्ये करण्यात आला मात्र १० जून २०२५ नंतर रेती उपसा बंद करण्याचे आदेश असताना सुद्धा अवैध रेती उपसा सुरू असल्याची तक्रार देण्यात आली.मात्र महसूल आणि पोलिस प्रशासन झोपेचे सोंग घेऊन शांत असल्याचे चित्र दिसत आहे.तसेच रेतीच्या अवजड वाहनांमुळे शाळेतील मुलांना शाळेत जाणे सुद्धा कठीण झाले असून याबाबत विद्यार्थ्यांनी तहसीलदार भद्रावती यांची भेट घेऊन निवेदन दिले, मात्र तहसीलदार साहेबांनी गांभीर्याने न घेता एक टीम पाठवून कुठलीही कारवाही न करता फक्त दिखावा केला.

याबाबत आमदार करण देवतळे यांनी भेट सुद्धा गावातील महिला व विद्यार्थ्यांनी घेतली असताना उद्याच तहसीलदार भद्रावती यांना मीटिंग घेण्याचे सांगितले, मात्र तो दिवस उजलाच नाही.

इतकं होऊन सुद्धा गणपती उत्सवाचा मोका साधत मोठ्या प्रमाणत उपास करण्यात आला असून महसूल आणि पोलिस मात्र कुठलीही कारवाही करण्याचा धाडस करताना दिसत नाही.तसेच रात्री अवैध रेती सुरू असताना गुंड प्रवृत्तीचे लोक रात्री फिरत असून गावात व आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरत आहे.

तरी याबाबत तत्काळ कारवाही न केल्यास गावातील सर्व महिला,विद्यार्थी व ग्रामस्थ तीव्र आंदोलन/उपोषण करणार असून तत्काळ अवैध रेती उपसा बंद करण्यात यावा तसेच अवजड वाहनांमुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त व अवैध रेती उपसा करणाऱ्या संबधित अधिकाऱ्यावर कारवाही करण्यात यावी अशी मागणी समस्त ग्रामवसियकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये