भद्रावती शिवसेना उबाठा तर्फे भारत-पाक सामन्याचा निषेध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पाकिस्थान पुरस्कृत दहशदवाद्यांनी पहलगाम येथे २६ निरपराध नागरिकांची क्रुरपणे हत्या करुन माणुसकीला काळीमा फासला.त्यावेळी पंतप्रधान मोदिंनी खुन आणी पाणी एकत्र वाहु शकत नाही असे म्हटले.
या घटनेनंतर देशातील नागरीकांच्या मनात पाकिस्तानविरोधात व्देशभावना पसरुन भारताने पाकीस्थानशी क्रिकेट खेळू नये अशी जनभावना आहे.मात्र सध्या सुरु असलेल्या आशीआयी कप सामन्यात केंद्राने भारत-पाक सामना खेळण्याची परवानगी दिल्याने देशातील नागरीकांमधे शासनाच्या विरोधात नाराजीचा सुर आहे.त्याचा आदर करीत भद्रावती शिवसेना ऊबाठा गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतर्फे हायवेवरील निंबाळा फाट्यावर भारत-पाक सामन्याचा निषेध करण्यात आला.यावेळी हा सामना खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल केंद्र शासनाचाही निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे,पंचायत समिती सदस्य अश्विनी ताजणे,लता दुधकोहळे, शांता राऊत,किरण ढवस,अल्का नागोसे,डाहुले,लता कोडापे,करुणा सीडाम,संगीता पिंपळशेंडे,शांता नन्नावरे यांचेसह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व सदस्य ऊपस्थीत होते.



