राष्ट्रसंत साहित्यावरील जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत ७०२ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रीगुरुदेव सेवाश्रम नागपूर अंतर्गत राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळ द्वारा आयोजित आणि राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या सहकार्याने यावर्षी गडचिरोली जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा निःशुल्क होती.
इयत्ता ७ ते १२ च्या विद्यार्थ्यांसाठी दोन गटात निबंधाचे विषय दिलेले होते . राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातील ग्रामनाथ , राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील सणोत्सव या विषयांवर एकूण ७०२ शालेय विद्यार्थ्यांनी निबंधस्पर्धेत सहभाग दर्शविला.
सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे असून उत्तम निबंध लिहिणाऱ्यां स्पर्धकांतून विजेत्या स्पर्धकांना लवकरच रोख पारितोषिके देण्यात येतील.
सदर स्पर्धा जिल्ह्यातील वसंत विद्यालय, महिला महाविद्यालय, जवाहर लाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा, स्कुल आफ स्कालर, रिपब्लिक इंग्लिश स्कूल, शिवाजी हायस्कूल, जि. प. हायस्कूल, राणी दुर्गावती हायस्कूल,विद्याभारती कन्या विद्यालय, श्री गुरुदेव उच्च प्राथमिक शाळा गडचिरोली, जि. प. शाळा पारडी,जि. प. उच्च प्राथमिक शाळा मौशीखांब, कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अमिर्झा, सिंधूताई पोरेड्डीवार हायस्कूल गोगाव, लोकमान्य टिळक विद्यालय गणपूर रै, नवयुग विद्यालय गुरवळा, नवजीवन विद्यालय राका, नुतन हिंदी हायस्कूल अरूणनगर आदी ठिकाणी निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
केंद्रीय अभ्यास मंडळाचे सदस्य ग्राम. बंडोपंत बोढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती कार्यवाह उदय धकाते,प्रा. विलास पारखी, केशव दशमुखे गुरूजी, पंडित पुडके, सुरेश मांडवगडे,किरण चौधरी,वरूण धोडरे ,पंकज भोगेवार ,तुषार निकुरे, अरुण पोगळे,गोवर्धन चव्हाण, डॉ. चंद्रकांत लेनगुरे,विजय साळवे,डी. एम. ब्राह्मणकर,महादेव चौधरी,सुधाकर पेटकर,मेघश्याम लांजेवार, प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, श्री.टेकाम गुरूजी, भाऊ पत्रे, महेंद्र दोनोडे आदींनी केले. जिल्हास्तरीय समितीचे अभ्यास मंडळाचे डॉ. बाळ पदवाड, नागपूर श्री गुरुदेव सेवाश्रमाचे अध्यक्ष एड. यावले यांनी आभार मानले आहे.