ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकमुळे गावातील लोकांना व प्रवाशांना त्रास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

ट्रान्सपोर्ट नगर जवळून जाणाऱ्या NHI 353B नॅशनल हायवेच्या धीमी लेनवर हरदोना खुर्द पासून तर हरदोना बु पर्यंत महामार्गावर अनेकदा ट्रक उभे असतात. लांबच्या लांब रांगा लागतात,त्यामुळे प्रवाशांना व गावातील लोकांना खूप त्रास होत आहे सध्या या परिसरात राष्ट्रीय महामार्गांवर अपघातांचे प्रमाण चिंताजनकपणे वाढले आहे. ही लेन बंद असल्यामुळे वाहतुकीत अडथळे येतात आणि अपघातांचा धोका वाढतो. पादचाऱ्यांना आणि लहान वाहनांनाही खूप अडचणी येतात. प्रशासनाने या गंभीर समस्येवर लक्ष द्यावे आणि ट्रक्सना योग्य पार्किंगच्या ठिकाणी उभे करण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून प्रवाशांना तसेच गावातील लोकांना दिलासा मिळेल.

अशी हरदोना येथील नागरिकांची मागणी आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये