ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुक्यात आजपासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या शासनाच्या महत्त्वकांक्षी अभियानाचा शुभारंभ देऊळगाव राजा तालुक्यात बुधवारी करण्यात येणार आहे.

पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांनी पंचायत समिती सभागृहात बैठक घेऊन अभियानाच्या शुभारंभाबाबत सविस्तर माहिती दिली. पंचायत समिती स्तरावर प्रसिद्धीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असून देऊळगाव राजा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात मोक्याच्या व सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स, कलापथक तयार करण्यात आले असून शाळेतील मुलांची प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पळसखेड झाल्टा गाव निश्चित करण्यात आले असून त्या ठिकाणी तालुकास्तरीय अभियानाचा शुभारंभ करण्यात येईल.

सर्व ग्रामपंचायत मध्ये दिनांक 17 सप्टेंबर रोजी ग्रामसभा पार पडणार आहेत व या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. शुभारंभाच्या ग्रामसभेसाठी एक हजार लोकसंख्येमागे किमान 250 ते 300 या प्रमाणात ग्रामपंचायतीची लोकसंख्या विचारात घेऊन अपेक्षित उपस्थिती ठेवण्या संदर्भात सुचना दिलेल्या आहेत. ग्रामसभेमध्ये प्रतिष्ठित व्यक्ती, अधिकारी, वकील, डॉक्टर, पत्रकार, यांना व्यावसायिकांना निमंत्रित केल्या जाणार आहे. तसेच गावातील महिला बचत गट, शिक्षक, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामस्तरीय सर्व शासकीय कर्मचारी, पोलीस पाटील कोतवाल, युवक, भजनी मंडळ, युट्युब आणि इंस्टाग्राम वर प्रसिद्ध व सक्रिय कार्यकर्ते अशा सर्व घटकांना सामावून घेण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी ग्रामसभेला उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

या ग्रामसभेचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. तालुका स्तरावरील पंचायत समितीच्या सर्व विभागातील विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, कृषी अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य पर्यवेक्षक, अन्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्रत्येक गावासाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील सर्व संबंधित गावांच्या ग्रामसभेतील उपस्थितांना राज्यस्तरावर होणाऱ्या शुभारंभाच्या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होता येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर स्क्रीन व प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात आली असून जेणेकरून ग्रामसभेला राज्यस्तरीय शुभारंभाचे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येईल.

    गावातील सर्व स्तरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शुभारंभ कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान उत्साहात सुरू करावे असे आवाहन गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये