ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर वार्ड क्रमांक सहा मधील रस्त्यांची दुरावस्था

खराब रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थी महिला व नागरिक त्रस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

नगरपरिषद गडचांदूर मधील वार्ड क्रमांक सहा मधील हिंदुस्थान लॉज च्या पाठीमागील गल्ल्यामधील रस्ताची दुर्दशा झाली आहे. या रस्त्याचे अद्यापही सिमेंटीकरण किंवा खडीकरण देखील झालेले नाही अगदी शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यासारखी याची अवस्था झाली आहे.

चिखलातून वाट काढत शाळेतील विद्यार्थी या रस्त्यावरून घसरून पडतात व त्यांना शाळेत जाणे ही शक्य होत नाही बाजारात जाणाऱ्या महिलांचे देखील तेच हाल आहेत ज्येष्ठ नागरिक व महिलांना देखील याचा खूप त्रास होत आहे या बाबतीत माहिती व तक्रार वारंवार नगराध्यक्ष सविता टेकाम यांच्याकडे करून देखील हेतू पुरस्कार याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप केला जात आहेत. अशा गलिच्छ रस्त्यांमुळे आणि साचलेले डपक्यांमुळे डेंगू मलेरिया सारखे गंभीर आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी नागरीकांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये