बाखर्डी नोकारी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला खोल नाली केल्याने शेतकरी त्रस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बाखर्डी – नोकारी रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राट दराने मुरमा करिता रस्त्याच्या कडेला 10 ते 15 फूट खोदकाम केले आहेत
यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून खड्ड्यांमध्ये गुरे ढोरे पडण्याची शक्यता असून अथवा जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही
नियमबाह्य कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग गडचांदूरचे दुर्लक्ष होत असताना दिसते
रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी ज्या ठिकाणी नाली एवढाही खड्डा नव्हता आता त्या ठिकाणी नाला वाहत आहे.
नाली खोदकाम केल्याने मधुकर भोयर यांच्या शेतात जाणारा जुना रस्ता बंद झाला असून आता त्यांना अर्धा किलोमीटर समोर जाऊन शेतात जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी त्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे