गडचांदूर लखमापूर सिमेंट रोड झाला चिखलमय..!
पावसात वाहने घसरून अनेक अपघात ; पावसात वाहतूक केल्यास खाण बंद पाडू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
माजी उपसरपंच मोरेश्वर आस्वले यांचा इशारा
अंबुजा कंपनीला कधी येणार जाग!
बांधकाम विभागाने दुर्लक्ष
गडचांदूर येथून जवळच असलेल्या लखमापूर येथे अंबुजा सिमेंट च्या मराठा लाइमस्टोन खाणीतून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक भर पावसात करत असल्याने गडचांदूर लखमापूर माईन्स पर्यंतचा सिमेंट काँक्रिट रोड चिखलमय झाल्याने पावसात वाहने घसरून अनेक अपघात होत असल्याने अंबुजा कंपनी व बांधकाम विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे.
गडचांदुर लखमापूर माईन्सपर्यंतचा जिल्ह्याला व तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता चिखलमय झाल्याने विद्यार्थ्यांची नागरिकांची गैरसोय होत आहे मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.
मागील एक वर्षापासून लखमापूर लाईम स्टोन खाणीचा या परिसरातील नागरिकांना प्रदूषणामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे यातच लाइम स्टोन खाणीतून ओव्हर लोड वाहतुकीमुळे पावसात संपूर्ण चिखल गडचांदूर लखमापूर पर्यंत रोडवर येत असल्याने रोडवर चिखलाचे थर बसल्याने रोज याच रस्त्याने तीन ते चार अपघात होत आहे.
लखमापूर लाईमस्टोन खाणीतून भर पावसात ओव्हरलोड वाहतूक करत असल्याने लखमापूर माइन्स ते गडचांदुर रोड चिखलमय झाल्याने रोजच अपघात होत आहे कंपनीने पावसात काम थांबवावे अन्यथा माईन्स बंद पाडू
मोरेश्वर आस्वले, माजी उपसरपंच ग्रामपंचायत लखमापूर
याबाबत अंबुजा कंपनीला सांगितले असता लखमापूर माइन्स हद्दीत पक्के मटेरिअल टाकून वाहतूक करावी जेणेकरून गडचांदुर लखमापूर माइन्स पर्यंत रस्ताव चिकलमय होणार नाही व नागरिकांची गैरसोय टळेल.
शुभम अड्डेटवार, सहाय्यक अभियंता सा.बा विभाग गडचांदुर