ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लखमापूर रेल्वे क्रॉसिंग जवळ पडलेले मोठ मोठे खड्डे देत आहेत अपघाताला निमंत्रण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर भोयगाव मार्गावरील लखमापूर रेल्वे क्रॉसिंग जवळ मोठ मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहतुकील अडथळा निर्माण होत असल्याने प्रवाशांना जीव घेणा प्रवास करावा लागत आहे.
हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहे, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन खड्डे बुजवावे अशी मागणी लखमापूरचे सरपंच अरुण जुमनाके , प्रा सुधीर थिपे, संदीप बावणे, शंकर उरकुडे, सचिन पिंपळशेंडे, अक्षय पोतराजे यांनी केली आहे.