ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ई पीक पाहणी शेतकऱ्यासाठी ठरत आहे डोकेदुखी 

अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने जुनीच पद्धत सुरू ठेवावी ; शेतकऱ्यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

खरीप हंगाम संपत आला तरी अद्याप पावतो बऱ्याच शेतकऱ्यांची ई पीक पाहणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या मुळे होऊ शकली नाही.

खरीप हंगामातील ई पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांना प्रचंड तांत्रिक अडचणी ला तोंड द्यावे लागत आहे. शासनाने मोबाईल अँप वर नोंदणी बंधनकारक केली आहे, मात्र बऱ्याच शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही,85 वर्षांवरील शेतकरी शेतात जाऊ शकत नाही असे शेतकरी ई पीक पाहणी पासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

ॲप मधील त्रुटी, नेटवर्क समस्या, सर्वर डाऊन, मुळे मोठ्या प्रमाणावर नोंदणी होऊ शकली नाही.

गावागावात इंटरनेट सेवा उपलब्ध नसणे, ओ टी पी न मिळणे, मोबाईल अँप वारंवार बंद पडणे, कृपया वाट पाहा, थांबा असा संदेश दिसणे या मुळे नोंदणी पूर्ण होऊ शकत नाही. नोंदणी करून सुद्धा बऱ्याच वेळा सात बारा वर नोंदी होत नाही.

शासनाने या वर्षी पासून सुरू केलेली मोबाईल अँप वरील ई पीक पाहणी शेतकऱ्यासाठी डोके दुखी ठरत असल्याने अनेक शेतकरी ई पीक पाहणी नोंदणी पासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्या मुळे जुनीच पद्धत सुरू ठेऊन पीकाची नोंद करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे, शासनाने ई पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी 20 सप्टेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

तरी सुद्धा सततधार पावसामुळे शेतात पाणी साचले असल्याने ई पीक पाहणी 100 टक्के होणार नाही हे स्पष्ट आहे, अतिशय त्रास दायक किचकट असलेली मोबाईल अँप वरून ई पीक पाहणी नोंदणी करण्याची पद्धत रद्द करण्यात यावी, जुनीच पद्धत सुरू ठेवावी अशी मागणी 75 वर्षांवरील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये