ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आदिलाबाद रोडवरील देवघाट टोल प्लाजा लोकसेवेत सज्ज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
– राजुरा आदीलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील देवघाट (कोरपना) येथील टोल प्लाजा शनिवारीपासून लोकसेवेत सज्ज झाला आहे. या टोल प्लाजाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांचे हस्ते पार पडले.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक सुनील गाडे उपनिरीक्षक देवानंद केकाण, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, लोणी सरपंच अविनाश वाभीटकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अभियंता अमित वाढी, टोल प्लाझा व्यवस्थापक ताहीर बेग आदी उपस्थित होते. हा टोल नाका आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून सर्व अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहे.
टोल भरण्याची प्रक्रिया सोपी व जलद असल्याने वाहतूकदारांसाठी सोयीचा आहे. याचबरोबर महामार्गावरील वाहतूकदारांसाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे.