ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्हा राकाँ (ग्रा.) अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या ‘राष्ट्रवादी पक्ष निरीक्षक’ पदाची अतिरिक्त जवाबदारी

चांदा ब्लास्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील आठवड्यात मोठी उलथापालथ होवून पक्षाच्या एका गटाने पक्षाशी बंडखोरी करीत अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकार मध्ये जाण्याचा निर्णय घेतला,राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी झाला त्यात गडचिरोली जिल्ह्यातील आमदार धर्मरावबाबा आत्राम हे देखील मंत्री झाले, त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांसह, महिला अध्यक्षा,युवक व इतर अनेक पदाधिकारी हे धर्मरावबाबा आत्राम यांच्या सोबत गेले.पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष शरद पवार हे त्याच दिवशी सर्व जिल्हावर लक्ष ठेवून माहिती घेत होते,रविवार दि.२ जुलै रोजी सायंकाळी त्यांनी मला फोन करून चंद्रपूर जिल्ह्याची माहिती घेतली,चंद्रपूर जिल्ह्यातून एकही पदाधिकारी,तालुका/शहर/विधानसभा कार्यकारिणीचे आणि पक्षाच्या वेगवेगळ्या ज्या फ्रंटल, आणि सेलचे सुद्धा सर्व पदाधिकारी पक्षासोबत आणि आपल्यासोबत असल्याची माहिती मी त्यांना दिली,त्याच वेळी त्यांनी मला गडचिरोली जिल्ह्यातून धर्मरावबाबा आत्राम गेल्यामुळे तिथे कसं करायचं विचारलं,मी २ तासांची वेळ शरद पवार यांना मागितली,२ तासात सर्वांशी बोलून मी आपल्याला माहिती देतो म्हणून सांगितलं. या दोन तासात मी धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोलीतील पक्षाच्या काही होतकरू पदाधिकाऱ्यांना मागील ७-८ वर्षात अडगळीत टाकले होते,त्या सर्वांशी मी संपर्क साधला,त्यात माजी जिल्हाध्यक्ष श्री.सुरेश सावकार पोरेड्डीवार,माजी जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार,विद्यमान जिल्हा कार्याध्यक्ष श्री.प्रकाश ताकसांडे,माजी जि.प.सभापती जगन्नाथ पाटील बोरकुटे,गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार,वडस्याचे श्याम घाईत,अलापल्लीचे इरफान पठाण,संजय कोचे,जिल्हा परिषदेचे दोन अध्यक्ष इत्यादींशी संपर्क साधला,ही सर्व मंडळी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षाचे काम करायला तयार झाली,मी साहेबांना आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांना लगेच ही सर्व माहिती दिली, या सर्वांशी प्रांताध्याक्ष जयंत पाटीलांनी दूरध्वनी वरून संपर्क साधला,आणि त्यांना ५जुलैच्या मेळाव्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले,सर्व सहभागी झाले.

या सर्व घडामोडींची तत्काळ लक्ष घालून आणि जिल्ह्याचा मी यापूर्वीही निरीक्षक असल्यामुळे,गडचिरोली जिल्ह्याचे पक्षाची घडी व्यवस्थित बसविण्यासाठी पक्षाने मला गडचिरोली जिल्ह्याची पक्ष निरीक्षक पदाची अतिरिक्त जवाबदारी दिली.

२०१९ ला गडचिरोली जिल्ह्याच्या निरीक्षक पदासोबतच  विधानसभा निवडणुकीसाठी विधानसभा निहाय निरीक्षकांची नियुक्ती पक्षाने केली. माझ्याकडे ‘अहेरी विधानसभा’ क्षेत्राचे निरीक्षक म्हणून जवाबदारी दिली होती, त्यावेळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजप कडून विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला,शेवटच्या क्षणी भाजपने धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी नाकारली,त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम मोठ्या अडचणीत सापडले,त्यांनी मला फोन केला मी मुंबईत माझ्या बल्लारपूर विधासभेच्या तिकीट साठी प्रयत्नात होतो. धर्मरावबाबा आत्राम यांचा मला फोन आला ,आणि राष्ट्रवादीच्या तिकीट मिळण्यासंदर्भात काही होवू शकते का म्हणू पहा अशी विनंती केली.मी तत्काळ मा.जयंतराव पाटील,अजितदादा पवार यांच्याशी संपर्क केला आणि या जागेचा ‘AB-Form’ पक्षाने माझ्याकडे दिला,या जागेवर काँग्रेस – राष्ट्रवादी-भाजपा अशी तिहेरी लढत झाली,आणि धर्मरावबाबा आत्राम विजयी झाले ते केवळ शेवटच्या क्षणी मी धावपळ करून समयसूचकता ठेवत उमेदवारी आणली म्हणून.

या सर्व पार्श्वभूमीवर पक्षाने गडचिरोली जिल्ह्याची पक्षाची विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्यासाठी माझ्यावर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सोबतच गडचिरोलीचे ही नवी जवाबदारी सोपविली आहे.त्यासाठी पक्ष नेतृत्वाचे मी आभार व्यक्त करतो.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये