महाविकास आघाडीकडून कायद्याविरोधात निषेध आंदोलन

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) : महाराष्ट्रातील महायुती सरकारने विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारित करून राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आज (10 सप्टेंबर) राज्यभर निषेध आंदोलन करण्यात आले.
घुग्घुस शहरातील गांधी चौकात दुपारी 12 ते 1 दरम्यान हातात बॅनर व फलक घेऊन काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल नरुले, शहराध्यक्ष राजुरेड्डी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहरप्रमुख बंटी घोरपडे, ज्येष्ठ नेते गणेश शेंडे, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) युवक शहराध्यक्ष शरद कुमार, ज्येष्ठ नेते सत्यनारायण डकरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी “महायुती सरकार मुर्दाबाद, भाजपा सरकार मुर्दाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, या कायद्याचा वापर सरकारविरोधी मत दाबण्यासाठी तसेच सामाजिक कार्यकर्ते, चळवळी व संघटनांना गप्प बसवण्यासाठी होणार आहे. केवळ अधिसूचनेद्वारे कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर घोषित करण्याचा अधिकार सरकारला मिळणार असून त्या संघटनेची मालमत्ता जप्त करता येईल. पदाधिकाऱ्यांबरोबरच सभेला हजेरी लावणाऱ्या नागरिकांनाही सात वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे हा कायदा “काळा कायदा” असल्याचा आरोप करण्यात आला.
या आंदोलनात शिवसेनेचे चेतन बोबडे, अमित बोरकर, लक्ष्मण बोबडे, हेमराज बावणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैय्यद अनवर, शामराव बोबडे, मुन्ना लोहानी, जिल्हा महासचिव अलीम शेख, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, ज्येष्ठ नेते जगन्नाथ आस्वाले, किशोर आवळे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, शेख शमिउद्दीन, एससी सेल तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, तालुका उपाध्यक्ष सिनू गुडला, शेखर तंगडपल्ली, एससी सेल जिल्हा उपाध्यक्ष कल्याण सोदारी, महिला जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, संध्या मंडल, पूनम कांबळे, प्रीती तामगाडगे, भाविका आटे, जोया शेख, एनएसयुआय अध्यक्ष आकाश चिलका, सुनील पाटील, अरविंद चहांदे, कुमार रुद्रारप, कपील गोगला, देव भंडारी, दिपक पेंदोर, शहंशाह शेख, संजय कोवे, दिपक कांबळे, अनवर सिद्दीकी, जय मेश्राम, अंकुश सपाटे आदींसह महाविकास आघाडीचे मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.