ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बैलबंडीवर वीज पडून शेतकरी जखमी

धानोली शेत शिवारातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

       आपल्या शेतातून बैलबंडीने घरी परत येत असताना बंडीवर वीज कोसळल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक १० रोज बुधवारला सायंकाळी ६.00 वा. सुमारास तालुक्यातील धानोली येथील शेत शिवारात घडली. नानाजी लक्ष्मण बारतीने, वय 65 वर्ष, राहणार धानोली असे या जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

लक्ष्मण बारतीने हे आपल्या शेतातून बैलबंडीवर घराकडे येत असताना अचानक विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. त्यात बंडीवर विज पडल्यामुळे ते जखमी होऊन बेशुद्ध झाले. शेतातून परतणाऱ्या इतर गावकऱ्यांना ते दिसल्याने त्यांनी त्यांना घरी आणले. उपचारासाठी त्यांना वरोरा येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये