शालेय ग्रंथपालांच्या समस्या मार्गी
नागपूर विभागातर्फे आ. सुधाकर अडबाले यांचा सत्कार संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
जिथे उर्वरित महाराष्ट्रात शालेय ग्रंथपालाना रजा रोखीकरण चा लाभ देय असताना नागपूर विभागातील सेवानिवृत्त शालेय ग्रंथपाल मागील २०२२ पासून या लाभापासून वंचित होता. दीर्घकालीन सुट्या लागू होत नसल्याचे स्पष्ट असताना आणि रजा रोखीकरण लाभ शासन स्तरावर मान्य असताना सुद्धा नागपूर विभागातील शालेय ग्रंथपालान यापासून वंचीत होते. संघटनेच्या माध्यमातून उपसंचालक कार्यालयात अनेकदा निवेदने देऊन प्रत्यक्ष भेटीही घेण्यात आल्या मात्र सातत्याने निराशा पदरात येत होती. उपसंचालकांचे आदेश नसल्याने सबंधित विभाग देयके स्वीकृत करीत नव्हती त्यामुळे सेवानिवृत्त ग्रंथपाल हतबल झाला होता.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आमदार अडबाले यांच्या कडे पाठपुरावा केला असता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना हि मागणी न्यायोचित व अधिकृत असल्याची माहिती दिली त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश येऊन दिनांक ४ सप्टेंबर रोजी उपसंचालक कार्यालय नागपूर यांनी आदेश पारित करून सबंधित विभागांना रजा रोखीकरण संबंधात देयके स्वीकारून ग्रंथपालांना लाभ देण्याचे परिपत्रक जारी केले.
शिक्षक दिवसाचे औचित्य साधून विदर्भ माध्यमिक ग्रंथपाल संघटने तर्फे आमदार सुधाकरराव अडबाले यांचा सहपत्निक सत्कार करण्यात आला. तद्वतच या लढ्यास प्रत्यक्ष सहकार्य करणारे विज्ञान व संशोधन विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक कुकडे साहेब , विमाशी चे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे यांचाहि सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास नागपूर विभागाचे श्रीराम भुसारी, लिमेश माणूसमारे, संजय रक्षमवार, विलास राजूरकर, विजय वाघाडे, गजानन नागेकर, अरविंद सिंह आदी सह चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातील ग्रंथपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणातून शिक्षण क्षेत्रातील शिक्षक असो वा शिक्षेकेतर असो माझी बांधिलकी सर्वांना समान न्याय देणारी असेल. आणि यापुढे वाचन संस्कृती टिकविण्यासाठी अर्धवेळ व पूर्णवेळ ग्रंथपालांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले.