महात्मा गांधी महाविद्यालयात पीएम- उषा अंतर्गत कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात दिनांक ०९ सप्टेंबर रोजी पीएम- उषा अंतर्गत कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेकरिता मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. एस.डी. पाटणकर सर उपस्थित होते. विज्ञान हा विषय शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात कोणते क्षेत्र उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांच्या करियर संदर्भात इतंभूत माहिती मुख्य मार्गदर्शकांनी या कार्यशाळेत समजावून सांगितली. शिक्षण घेऊन फक्त नोकरीच मिळावी या आशेवर न राहता शिक्षणाचा उपयोग स्वयंरोजगार कसा निर्माण करता येईल, तसेच मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करून बुद्धी विकसित कशी करता येईल, या कडे विद्यार्थ्यांचा काळ असायला पाहिजे. त्याचबरोबर ABC – ID कशी बनवावी यावरही त्यांनी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी डिजिलॉकर या WEBSITE वर जाऊन आपली शैक्षणिक माहिती अपलोड करून अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट ची आयडी टायर करताना येणाऱ्या अडचणी दूर करता येईल. त्यांनी सांगितले.
दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. उत्कर्ष मून यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे आयोजन पीएम- उषाचे महाविद्यालयातील समन्वयक प्रा. रामकृष्ण पटले व IQAC चे समन्वयक डॉ. उत्कर्ष मून यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव हे होते तसेच कार्यक्रमाचे संचालन प्रा. चेतन वानखेडे यांनी तर कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. पटले यांनी केले. प्रा. चेतन वैद्य यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा शेवट केला.
तसेच सदर कार्यशाळे च्या आयोजनासाठी डॉ. मनोहर भाऊराव बांदरे, इतर सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी मोठया प्रमाणात विद्यार्थी कार्यक्रमाला हजर होते.