ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदुर मध्ये नवीन आधार केंद्र सुरू करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर नगरपरिषद अंतर्गत या पूर्वी मंजूर झालेल्या तीन महाऑनलाईन सेवा केंद्र ,तसेच पोस्ट ऑफिसमध्ये व स्टेट बँकेच्या कार्यालयातील सुरू करण्यात आलेल्या आधार केंद्रातील सेवा बंद झाली असल्याने आधार कार्ड दुरुस्ती, नवीन आधार कार्ड काढणे, मोबाईल नंबर लिंक करणे, बोटांचे ठसे अद्ययावत करणे, विवाहानंतर नावात बदल करणे, नवीन जन्मलेल्या बालकांचे आधार कार्ड काढणे, इत्यादी महत्त्वपूर्ण बाबी साठी जनता हैराण होत असून त्या करिता जिल्ह्यातील आधार केंद्र आज कुठे सुरू आहे व आपला नंबर लागेल की नाही या विवंचनेत नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत.

दर पाच वर्षांनी आधार अपडेट करणे जरूरी असून त्या करिता सुरू असलेल्या केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते.लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक यामुळे दिवसभर वाट पाहून परत जात आहेत व गोर गरीब मजूर वर्ग आपलं मजुरीचे काम सोडून आधार कार्ड दुरुस्ती साठी तासनतास ताटकळत उभे असतात. त्या मुळे गडचांदुर महसुली मंडळातील गडचांदुर शहरात आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून लोक मोठ्या प्रमाणात येत असल्याने व परिसरातील मोठी बाजार पेठ असल्याने ग्रामीण रुग्णालय, पोस्ट ऑफीस, स्टेट बँक, पोलिस स्टेशन(माणिकगड चौक), वनविभाग कार्यालय (गांधी चौक) या ठिकाणी नवीन आधार केंद्र सुरू करण्यात यावे अशी जनतेची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून नुकतेच नवीन आधार केंद्र सुरू करण्याबाबत जाहिरात दिली आहे परंतु कोरपना तालुक्यातील कोणत्याही गावात नवीन आधार केंद्र सुरू करण्यासाठी जाहिरात नाही.

गडचांदूर हे मध्यवर्ती ठिकाण आल्याने या ठिकाणी आधार केंद्रांची संख्या वाढविल्यास जनतेची गैरसोय दूर होणार आहे.तरी याबाबत जिल्हाधिकारी साहेब व राजुरा क्षेत्राचे आमदार देवराव भाऊ भोंगळे यांनी त्वरीत विशेष लक्ष देऊन नवीन आधार केंद्र सुरू करावे अशी मागणी अशी मागणी गडचांदुर तालुका संघर्ष समिती च्या वतीने करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये