भर दिवसा राजस्थानी बकऱ्या व बोकड अज्ञात वाहन चालकने चोरून नेल्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
पिंपळनेर देऊळगाव राजा येथील जिजामाता प्लॉटिंग परिसरातून भरदिवसा 2 राजस्थानी बकऱ्या व 2 राजस्थानी बोकड अज्ञात व्यक्तीने स्विफ्ट डिझायर गाडीत टाकून चोरून नेल्याची घटना आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली.
सविस्तर वृत्त असे की फिर्यादीसुनील शिवाजी लोखंडे रा पिंपळनेर यांचे वडील बक-या चारण्यासाठी जंगलामध्ये घेवुन गेले होते. जंगलात बकऱ्या चारून 11/30 वा चे सुमारास त्यांनी पिंपळनेर गावाचे शेजारी असलेल्या जिजामाता प्लाटींग परीसरात आणुन आंब्याच्या झाडाखाली बक-या बसण्यासाठी सोडुन दिल्या. व ते थोड्या अंतरावर जावुन बसले नंतर उमेश सतिश अंभोरे हा जिजामाता प्लाटींग परीसरात फिरण्यासाठी गेला होता.
तेव्हा त्याला तेथे दोन बोकड व दोन राजस्थानी बक-या हया कोणीतरी अज्ञात चोर त्यांच्या पांढ-या रंगाची स्वीफट डिझायर गाडीमध्ये टाकुन चोरून नेल्या त्यामुळे अंदाजे 33 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात आज सायंकाळी 5 वाजता दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद गवई करीत आहेत.