ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाम फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जोपासत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य

जागर नामचा दशकपूर्ती सोहळ्या निमित्ताने स्नेह मेळाव्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, आसाम आंध्र प्रदेश, व काश्मीर राज्यात जलसंधारणाच्या कामासाठी प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर यांनी दिनांक 5सप्टेंबर 2015 रोजी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत युद्ध पातळीवर शेकडो तलावातील गाळ काढून त्या त्या परिसरात कायमस्वरूपी दुष्काळ संपण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे नाम फाउंडेशन ने ज्या ज्या भागात जलसंधारनाची कामे हाती घेतली त्या त्या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केलेले आहे नाम फाउंडेशनच्या दशक पूर्ती सोहळ्या निमित्ताने दिनांक 14 सप्टेंबर 25 रोजी पुणे येथे जागर नामचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 महाराष्ट्रसह भारतातील अनेक राज्यात अनेकदा पर्जन्यमान कमी झाले की पाणीटंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत असे यासाठी त्या त्या राज्याने दरवर्षी जलसंधारणाची कामे लोकसभागातून करण्यास प्राधान्य दिले जल है तो कल है या म्हणीप्रमाणे हे वास्तव ब्रीद वाक्य वास्तव्यात उतरण्यासाठी व समाजामध्ये वावरताना आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागते ही भावना मनात ठेवून प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे या जोडीने नियोजनबद्ध जलसंधारणाची कामे करण्याचा निर्णय घेतला व 5 सप्टेंबर 15 रोजी नाम फाउंडेशनची स्थापना केली व राज्यसह आसाम, काश्मीर,आंध्र प्रदेश, व उत्तर प्रदेश या राज्यात ज्या ज्या ठिकाणी लहान-मोठी जलाशये आहेत मोठ मोठ्या नद्या आहेत त्यातील नाम मात्र, दरात गाळ काढण्यास युद्ध पातळीवर सुरुवात केली लाखो शेतकऱ्यांनी तलावातील निघालेला गाळ आपल्या शेतात नेऊन टाकल्याने त्यांच्या शेत जमिनीचा पोत सुधारला पर्यायाने प्रत्येक पिकाचे उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून त्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यास या जलसंधारच्या कामामुळे मदत झाली जल संधरणाच्या कामामुळे शेतकरी आत्महत्या होण्याच्या घटनेत घट झाल्याची दिसून येत आहे नाम फाउंडेशनच्या या उपक्रमास यावर्षी एक दशक पूर्ण होत आहे.

या दशकात त्यांनी जलसंधारची फार मोठी मोठी कामे पूर्णत्वास नेली या संस्थेने ज्या ज्या भागात जलसंधारणाची कामे केली त्या त्या भागातील शेतकरी हा केवळ नाना पाटेकर मुळे हे शक्य होऊ शकले असे सांगतात दशकपूर्ती सोहळ्यानिमित्ताने जागर नामचा स्नेह मेळाव्याचे आयोजन दिनांक 14 सप्टेंबर 25 रोजी पुणे येथे करण्यात आले आहे या मेळाव्यासाठी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांची पाठ थोपटण्यासाठी देशाचे अवजड मंत्री नितीन गडकरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथराव शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे उपस्थित राहणार आहे.

या स्नेह मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन नाम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नाना पाटेकर व संस्थापक सेक्रेटरी मकरंद अनासपुरे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये