
चांदा ब्लास्ट
देऊळगाव राजा ते चिखली रोड वरील अग्रवाल यांच्या सिमेंट गोडाऊन समोर अज्ञात मालवाहू वाहनाने मोटारसायकल ला धडक दिल्याने मोटार सायकल वरील इसम जखमी झाल्याची घटना 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता घडली
घटनेची तक्रार आज 9 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालक विरोधात गुन्हा दाखल केला आहे
सविस्तर वृत्त असे की, संकेत रवींद्र देशमुख हे त्यांचे मोटारसायकलने त्यांचे वडीलांना कामवरुन घरी घेवुन येत असतांना अग्रवाल यांच्या सिमेंट गोडाऊन समोर अज्ञात वाहनाने मागुन येवुन भरधाव वेगाने व निष्काळजी पणे चालवुन मोटार सायकल ला कट मारल्याने फिर्यादी व त्यांचे वडील मोटार सायकल वरुन खाली पडुन अपघातात फिचे वडीलाचा उजवा पाय फॅक्चर झाला आहे.
संकेत देशमुख यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालक विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ माधव कुटे करीत आहे.