ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा : कोतवाल संघटनेची मागणी

१२ सप्टेंबर पासुन राज्यस्तरीय बेमुदत धरणे आंदोलन : दिलीप नागपुरे (अध्यक्ष कोतवाल संघटना)

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            महाराष्ट्र राज्यातील महसुल सेवक (कोतवाल) या पदाला महसूल विभागाच्या चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करावे या मागणीसाठी दि. १२ सप्टेंबर पासून राज्यस्तरीय बेमुदत धरणा आंदोलन करणार आहे. येथील कोतवाल संघटना तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन करणार असल्याचे महसूल सेवक (कोतवाल) तालुका संघटनेचे अध्यक्ष दिलीप नागपुरे यांनी सांगितले.

         महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाचा कणा समजला जाणाऱ्या या पदाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध योजना तसेच महसूल विभाग वगळता इतर कार्यालयाची कामे सुद्धा करावी लागतात. एवढे काम करून सुद्धा शासनाने अद्यापर्यंत कोतवाल पदास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्या प्रमाणे सेवा सुविधा लागू केली.

इतर महसूल कर्मचाऱ्या प्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन अन्याय दूर करावा अन्यथा महसुल कोतवाल संघटना दि. १२ सप्टेंबर पासून बेमुदत आंदोलन करणार असल्याचे नागपुरे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये