ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनतर्फे भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन*

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
सरसंघचालक श्री मोहनजी भागवत व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन, संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व न्यू एरा क्लीनटेक सॉल्यूशन प्राइवेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन तालुक्यात करण्यात आलेले आहे.
भद्रावती तालुक्यात ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन यांच्या वतीने मोफत सर्वांगिण आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ग्रामीण व शहरी भागातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन मिळणार आहे.
11 सप्टेंबरला ढोरवासा येथील ग्रामपंचायत मध्ये शिबिराचे उद्घाटन होणार असून 12 सप्टेंबरला चारगाव येथील ग्रामपंचायत व तेलवास मधील जिल्हा परिषद शाळेत मध्ये, 13 सप्टेंबरला गरवाला येथील हनुमान मंदिरामध्ये, 14 सप्टेंबरला कुरोडा येथे तर 15 सप्टेंबरला चिरादेवी समाज भवन येथे व पिंपरी ग्रामपंचायत येथे तर 16 सप्टेंबरला केसुरली गावात शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 17 सप्टेंबरला विसाजन येथील घोडमारे लॉन व सभागृह येथे शिबिराचा समारोप होणार आहे.
शिबिरामध्ये हृदय तपासणी, ईसीजी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, किडनी कार्य तपासणी, हाडे व सांधेदुखी तपासणी, नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणी, कर्करोग तपासणी, थायरॉईड तपासणी तसेच गुडघे व सांधेदुखी एक्सरे तसेच तपसणी, निदान, उपचार व गरज असल्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल. शिबिरात सर्वसाधारण आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. रुग्णांना आवश्यक तेथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य औषधोपचार व पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
“ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या शहरांत जाऊन खर्चिक तपासण्या करण्याऐवजी त्यांच्या गावातच मोफत सुविधा उपलब्ध करून देणे”. हा मुख्य उद्देश शिबिराचा आहे.शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित आरोग्यसेवक तसेच आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध राहतील. शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी घेऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थानिक ग्रामस्थ व गरजू रुग्णाणी या शिबिराचा लाभ घ्यावा व आरोग्य तपासणी करून घ्या – निरोगी राहा” असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष मधुसूदन अग्रवाल यांनी केले आहे.