ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तुकडोजी नगर येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना – वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा मंडळ, तुकडोजी नगर तालुका कोरपना च्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी व तुकडोजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम तुकडोजीनगर येथे दिनांक ४ , ५ नोव्हेंबर ला आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्य शनिवार दिनांक चार ला पहाटे साडेपाच वाजता ग्रामस्वच्छता अभियान, सहा वाजता घटस्थापना, सात वाजता सामूहिक ध्यान, साडेसात वाजता रामधून, साडेआठ वाजता शारदा महिला मंडळ हेटी यांचे भजन, नऊ वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ह भ प भुसारी महाराज वनसडी, ह भ प भेंडाळे महाराज, ह भ प मीन्नाथ महाराज यांच्या शुभ हस्ते, साडेसहा वाजता सामुदायिक प्रार्थना, रात्रौ नऊ वाजता जागृती भजन गुरुदेव सेवा मंडळ हेटी, रविवार दिनांक पाचला पहाटे साडेपाच वाजता ग्रामस्वच्छता अभियान, सहा वाजता सामुदायिक ध्यान, साडेसात वाजता रामधून भजन पालखी दिंडी सहगावातून कलश मिरवणूक, साडेआठ वाजता जय दुर्गा भजन मंडळ दुर्गाडी, जिजामाता भारुड मंडळ गांधीनगर, प्राचार्य संजय ठावरी, रामेश्वर जाधव सर, ह भ प मीनाथ महाराज पेटकर यांचे समाज प्रबोधन ग्रामगीता चरित्रावर मार्गदर्शन, दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी काल्याचे किर्तन ह भ प विठ्ठल महाराज डाखरे, सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी मौन श्रद्धांजली कार्यक्रम आरती व राष्ट्र वंदना, पाच वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे उद्घघाटक म्हणून राष्ट्रधर्म प्रचार समिती जिल्हा सचिव ह भ प बापूजी पिंपळकर, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी ह भ प खुशालराव गोहोकार, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शंकरराव गिरटकर आदी सह मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.

तरी आयोजित कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा मंडळ तुकडोजी नगर व ग्रामस्थ यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये