कोरपणा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे थाटात समापन
विविध गटामधून 100 शाळांनी नोंदविला सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
विद्यार्थ्यांनो विज्ञानाची कास धरा याशिवाय तरुण उपाय नाही – प्राचार्य अनिल मुसळे
जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर,पंचायत समिती कोरपना शिक्षण विभाग व श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नांदा यांच्या संयुक्त विद्यमानाने 52 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन नांदा येथे श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मध्ये नुकतेच करण्यात आले होते. तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा तीनही गटांमध्ये 100 शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला याशिवाय मार्गदर्शक शिक्षक व सहभागी विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा निबंध स्पर्धा अशा स्पर्धा सुद्धा पार पडल्या.
शेवटच्या दिवशी प्रदर्शनी सर्वच शाळांकरिता खुली करण्यात आली, दरम्यान जिल्हास्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये सहभाग घेण्याकरिता तीन विज्ञान प्रतिकृतींची निवड करण्यात आली ज्यामध्ये होली फॅमिली पब्लिक स्कूल थू टरा गडचांदूर ,माध्यमिक गटात गैर आदिवासी विभागात जिल्हा परिषद हायस्कूल कान्हालगाव, आदिवासी गटामध्ये महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली, उच्च प्राथमिक गटामध्ये जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव शिक्षक प्रतिकृतीमध्ये गोविंद पेढेवाड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाल गु डा सुरेश उद्धवराव पाटील सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर अनिल मंदे लालबहादूर शास्त्री विद्यालय गट चांदुर याशिवाय माउंट पब्लिक स्कूल नांदा फाटा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भारोसा महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव यांनी क्रमांक पटकावले बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी सचिन कुमार मालवी होते.
बक्षीस वितरक म्हणून संजय राव मुसळे कोषाध्यक्ष तथा माजी सभापती कोरपणा अधिकारी कल्याण जोगदंड, खांडरे सरपंच मेघा नरेश पेंदोर प्राचार्य अनिल मुसळे,केंद्रप्रमुख पंढरी मुसळे,उपाध्यक्ष वसंत आवारी प्रामुख्याने उपस्थित होते.
परीक्षक म्हणून प्राध्यापिका ताकसांडे, प्राध्यापक प्रभाकर कोल्हे प्राध्यापक बुरान यांनी काम पाहिले बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे संचालन विशेष शिक्षक बर्डे यांनी तर आभार प्राध्यापिका मुसळे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी संपूर्ण प्रक्रियेत विषय तज्ञ विकास भांडारवार विषयतज्ञ काटकर मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य दिले प्राविण्य प्राप्त शाळांना स्मृती चित्र प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.