ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कचनेर येथे पौर्णिमा निमित्ताने भगवंतांचा पंचामृत अभिषेक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

संपूर्ण भारतभर असलेल्या प्रत्येक दिगंबर जैन मंदिरात व जैन तीर्थक्षेत्र या ठिकाणीं दिनांक 28/6/ 25 ते 6 /9 /25 या कालावधीत पर्यूषण पर्व निमित्ताने मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला, भगवंतांच्या भक्ती मध्ये दिगंबर जैन समाज लीन होऊन गेला होता पर्यूषण पर्वाच्या सांगते नंतर मराठवाड्यातील संपूर्ण भारतात प्रसिद्ध झालेले कचनेर येथील श्री चिंतामणी पार्श्वनाथ अतिशय क्षेत्र येथे भाद्रपद पौर्णिमा निमित्ताने दिनांक 7 सप्टेंबर रोजी हजारो भक्तांच्या उपस्थितीत व बाबांच्या नामाचा जयघोष करत पंचामृत अभिषेक करण्यात आला या अतिशय क्षेत्रात स्थापन असलेल्या श्री चिंतामणी पार्श्वनाथ भगवंत यांच्या मूर्ती मागे इतिहास प्राप्त आहे.

 दिगंबर जैन समाजाची काशी म्हणून अतिशय तीर्थक्षेत्र कचनेरची ओळख संपूर्ण भारतभर आहे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे हे चिंतामणी बाबा असल्याने या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी व त्यांच्या पंचामृत अभिषेक करण्यासाठी भक्तगण नियमित या ठिकाणी येत असतात या ठिकाणच्या संस्थांकडून भक्तांना थांबण्यासाठी भक्तनिवासची सुविधेसह भोजन शाळा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे संभाजीनगर पासून केवळ 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या बाबांच्या दरबाराला पुरातन इतिहास प्राप्त असल्याचे पुरावे या ठिकाणी उपलब्ध आहेत जवळपास 250 वर्षांपूर्वी याच गावातील एक गोमाता नित्यनेमाने दररोज जंगलातून परत आल्यावर आज ज्या ठिकाणी भगवंतांची प्रतिमा स्थापित आहे त्या ठिकाणी स्वतःच्या स्तणातून दूध देऊन नंतर गोठ्यात जात असे ही घटना त्या गावातील संपतराव नामक व्यक्तीची आजी नेहमी पाहत असे एक दिवस त्या आजीने त्या गोमातेला गोठ्यात बांधून ठेवले व सायंकाळी त्या गोमातेने दोरी तोडून त्याच ठिकाणी जाऊन परत आपल्या स्तणातून दूध दिले ती आधी आश्चर्यचकित झाली तिने एक दिवस तिचे स्वप्नात आले की ज्या ठिकाणी गोमाता दूध सोडते त्या ठिकाणी मोठा भुयार आहे व त्या ठिकाणी एक मूर्ती आहे व ती मूर्ती असे संकेत देते होती की मला या ठिकाणाहून बाहेर काढा त्या वृद्धाआजीच्या म्हणण्यानुसार कामाला सुरुवात करण्यात आली स्वप्नात आल्यानुसार भुयार लागले आत शिड्या होत्या व सप्तफणीयुक्त चिंतामणी पार्श्वनाथ भगवंतांची प्रतिमा होती या गावात जैन समाज नव्हता त्यामुळे या गावातील नागरिकांनी ही माहिती समाजाला दिली नंतर दिगंबर जैन समाजाने या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा केली, एक दिवस अचानक एक घटना घडली बाबांची प्रतिमा खंडित झाली व मानेपासून वरचा भाग खाली पडला व शरीर तसेच राहिले समाजाने सदर प्रतिमा विसर्जित करण्याचा निर्णय घेऊन श्रीक्षेत्र जैनपुर, (जिंतूर) येथून श्री महावीर स्वामी यांची प्रतिमा आणण्याचा निर्णय घेतला व प्रतिमा आणताना व वेदीवर स्थापित करताना काही घटना घडल्या त्यानंतर कचनेर पासून जवळ असलेल्या पिंपरीतील कासलीवाल या भक्तांच्या स्वप्नात बाबा आले व त्यांनी सांगितले की मला विसर्जित करू नका मला एका खोलीत खड्डा करून त्यामध्ये तूप साखर टाकून सात दिवस पुरून ठेवा व खोलीचे दरवाजे बंद करून घ्या तसेच केले व भजन पूजा सुरू झाली आठव्या दिवशी त्या बंद दरवाज्याचे कुलूप आपोआप उघडले व भक्तांनी पाहिले की बाबांची प्रतिमा पहिल्यासारखीच जोडल्या गेलेली आहे.

आजही त्या प्रतिमेच्या मानेवर प्रतिमा जोडल्या गेल्याचे निशाण स्पष्ट दिसतात या चमत्कारामुळे या क्षेत्राला अतिशय तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण भारतभर ओळखले जाते दिनांक 7 सप्टेंबर 25 रोजी भाद्रपद पौर्णिमा निमित्ताने भगवंतांचा पंचामृत अभिषेक व इंद्र इंद्रायणी होण्याचा मान शांतीकुमार शहा व डॉक्टर प्रितेश कुमार शहा यांना तर शांति मंत्र अभिषेक चा मान सौ सोनाली सुहास चवरे मलकापूर यांना व महाप्रसाद वाटपाचा मान चंद्रप्रभा स्वरूपचं कासलीवाल,डॉक्टर प्रवीण, निरज, पंकज, प्रीतम, आडूळ (अंबड)निवासी यांना प्राप्त झाला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये