ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- जिवती सारख्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या काहीशा अप्रगत अशा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना रोजगारांचे नवे दालने खुले व्हावे आणि त्यांनाही उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध व्हावी, हा उद्देश डोळ्यासमक्ष ठेऊन विदर्भ महाविद्यालय, जिवती चे प्लेसमेंट सेल, रसायनशास्त्र विभाग आणि नवसाथी सर्व्हिसेस प्रा. ली. हैद्राबाद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सदर महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला या परिसरातील विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील पदवीधर, पदव्युत्तर तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या मेळाव्यात आयटी, बँकिंग, रिटेल, फार्मा, उत्पादन, सेवा आदी विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध असून त्यांचा लाभ शिक्षणाच्या पात्रतेनुसार विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन सदर संस्थेचे मार्केटिंग मॅनेजर कृष्णा कदम यांनी करुन, त्यांनी कामाचे स्वरुप, कामाचे तास, वेतन, शैक्षणीक पात्रता याविषयी विस्तृत विवेचन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपुढे सादर केले. या भागातील उमेदवारांना कंपनी प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची व मुलाखतीची संधी ऊपलब्ध करून दिली.

सदर महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. एस. एच. शाक्य यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे तर रोजगार मिळविण्याच्या संधी उपलब्ध करून देणे हेच महाविद्यालयाचे ध्येय आहे. अशा रोजगार मेळाव्यांमुळे ग्रामीण व शहरी भागातील तरुणांसाठी नवे दरवाजे खुले होतात.”

 तर प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. परवेझ अली यांनी आपल्या भाषणात प्रतिपादित केले की, “तरुणाईला योग्य विचारपीठ मिळाल्यास ते सक्षमतेने रोजगार मिळवू शकतात. हा मेळावा ही त्याची एक प्रभावी पायरी आहे.”

मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगून आयोजकांचे आभार मानले. हा रोजगार मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रा. गंगाधर लांडगे, प्रा. सी. जे. तेलंग, डॉ. डोर्लीकर मॅडम, प्रा. सचिन शिंदे, प्रा. संजय मुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. दिनेश दुर्योधन तर आभार प्रा. गणेश कदम यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये