ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माणदेशी कवी लक्ष्मण हेंबाडे यांचा झाडीबोली साहित्य मंडळातर्फे सत्कार

पांदवाटकाराच्या काव्यातून ग्रामीण जीवनाचे वास्तववादी दर्शन - ग्रामगीताचार्य बोढेकर

चांदा ब्लास्ट

 ‌ कवी आपल्या लेखणीतून समाज जीवनाचे चित्रण आपल्या काव्यातून मांडत असतो. समाजात योग्य वळण लागावे, ही त्यांची धडपड असते. याच विचाराने प्रेरित होऊन ग्रामीण जीवनाचे अस्सल लेखन करणारे पांदवाटकार लक्ष्मण हेंम्बाडे यांच्या माणदेशी बोली सदृश कविता म्हणजे कृषी जीवनाचा उत्तम आलेख असल्याचे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.

    समाधी वार्ड येथील सेजल प्लाझा येथे नक्षत्राचं देणं काव्यमंच व झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर शाखेच्या वतीने माणदेशी कवी लक्ष्मण हेंम्बाडे यांच्या काव्यवाचनाचा छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते तर विशेष अतिथी म्हणून मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील कवी लक्ष्मण हेंबाडे, राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे सदस्य विलास चौधरी, झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर शाखाध्यक्ष प्रा‌ . नामदेव मोरे , सचिव डॉ. धर्मा गावंडे, नक्षत्रांच देणं काव्यमंचच्या जिल्हाध्यक्ष रोहिणी मंगरूळकर उपस्थित होते. यावेळी कवी हेंम्बाडे यांनी स्वरचित मुसळ, पांदवाट, सत्तांतर आदी कवितेचे सादरीकरण केले.

त्यातून अस्सल माणदेशी शब्द, त्या भागातील परंपरा, संस्कृती व मानवी नाते संबंध, कृषी दर्शन यावरही आपल्या काव्यातून प्रकाश टाकला व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी बाल कवयित्री कु. झाडे यांनी काव्य वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धर्मा गावंडे यांनी केले तर कवी हेंम्बाडे यांचा परिचय प्रा.नामदेव मोरे यांनी करून दिला. श्रीमती रोहिणी मंगरूळकर यांनी आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये