महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे स्व. वामनरावजी गड्डमवार यांच्या जयंतीनिमित्त गुणवतांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे संस्थापक अध्यक्ष,माजी राज्यमंत्री, माजी जि. प. अध्यक्ष, लोकनेते स्व. वामनरावजी गड्डमवार यांची जयंती स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे साजरी करण्यात आली याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. वामनरावजी गड्डमवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून व गोंडवाना विद्यापीठ गीताने करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिनेट सदस्य डॉ. दिलिप चौधरी, प्रमुख उपस्थिती म्हणून मीना नंदनवार तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए चंद्रमौली उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयातील बि.ए.बि.एस.सी.बि. कॉम. एम ए,एम कॉम व एम एस सी वर्गातील प्रथम व द्वितीय येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच महाविद्यालयातील विविध विभागातील विविध ठिकाणी प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाहुण्याच्या हस्थे सत्कार करण्यात आला.
तसेच आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयातिल प्राध्यापक डॉ. संघानंद बागडे व डॉ. संदीप देशमुख यांना व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील अभ्यास मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. अशोक खोब्रागडे व डॉ प्रफुल्ल वैराळे यांना महाविद्यालयाच्या वतीने गौरविण्यात आले. याप्रसंगी डॉ दिलीप चौधरी यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी व स्वतःचे जीवन घडविन्याबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच उपजिल्हा रुग्णालय मूल येथील समुपदेशक मीना नंदनवार यांनी आरोग्य विषयावर सखोल मार्गदर्शन केले. व डॉ राम वासेकर यांनी स्व गड्डमवार साहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए चंद्रमौली यांनी लिहिलेल्या “मंजुकपूर कादंबरीतील स्त्रीवाद” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रेरणा मोडक, प्रस्थाविक प्रा प्रशांत वासाडे तर आभार डॉ संघानंद बागडे यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.